भंडारा: गोसीखुर्द धरणाच्या (Bhandara Gosikhurd Dam) पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्यामुळे गोसीखुर्द धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्याकरिता धरणाचे 33 पैकी 33 गेट उघडण्यात आले असून धरणातून आवश्यकते नुसार टप्प्याटप्प्याने विसर्ग वैनगंगा नदीपात्रात सुरूच आहे. त्यामुळे विहित पाणी पातळी राखण्यासाठी दिनांक 29/07/2026 रोजी रात्रो 07.00 वा. गोसीखुर्द प्रकल्प स्थळावरुन प्राप्त माहिती नुसार धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील अतिवृष्टीमुळे धरणातील विसर्ग वाढवून 2950.30 क्युमेक्स करण्यात आल होत पण आज दिनांक 30/07/2026 रोजी सकाळी 04.00 वा. विसर्ग वाढवून 3679.54 क्युमेक्स पर्यंत वाढवण्यात येत आहे. पाण्याच्या आवकनुसार या विसर्गात टप्प्याटप्प्याने वाढ किंवा घट करण्यात येईल. विसर्ग मध्ये पुन्हा वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
Gosikhurd National Project (GSK)
- Date : 30-07-2026, @04:00 Hrs.
- Level : 243.930 m (FRL : 245.500 m)
- GS : 837.254 MCM (73.05%)
- LS : 431.347 MCM (58.28%)
Inflow & Ouflow 1 Hourly:
- IF : 26.310 MCM / 3655.00 m³/sec
- OF : 28.010 MCM / 3891.00 m³/sec
- Trend : Falling ( -1 cm in 2 Hr)
Gate Position : 33 Gate Open By 0.5m.
- Spillway : 3679.54 m³/sec
- PH : 160 m³/sec
- RBC PH : 48 m³/sec
Total Discharge in River :
- 3839.54 m³/sec (135592 Cusec)
- For Irrigation :
- RBC : 48 m³/sec
- LBC : 2.5 m³/sec
सूचना : आवशक्यता पडल्यास विसर्गात पुन्हा वाढ होईल - अशी शक्यता दर्शविण्यात्त येत आहे.
प्रशासनाचे अलर्ट: आपल्या जिल्ह्यातील वैनगंगा नदी पात्रात गोसीखुर्द धरणातून टप्प्याटप्प्याने पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. तरी नदी काठावरील गावातील नागरिकांनी सतर्क आणि सुरक्षित राहावे. संपर्क १०७७
गोसीखुर्द धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्याकरिता पुढील काही तासात धरणाच्या विसर्गात पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे. नदी काठांवर राहणारे आणि नदी पात्रातून ये- जा करणाऱ्या नागरिकंनी काळजी घ्यावी, सतर्क रहावे, असे आवाहन बातमी एक्सप्रेस टीम सर्व जिल्ह्यातील वाचकान करीत आहे.




कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.