गडचिरोलीत आश्रमशाळेच्या वसतिगृहात सर्पदंशाची थरारक घटना; 3 विद्यार्थिनींचा मृत्यू, 3 गंभीर | Batmi Express

Be
0
Gadchiroli,Gadchiroli News,Nagpur,Nagpur  news,

जागतिक आदिवासी दिनाच्या उत्साहावर दुःखाचे सावट; जपतलाई येथील घटनेने खळबळ

गडचिरोली | Batmi Express : जागतिक आदिवासी दिनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात उत्साहाचे वातावरण असतानाच धानोरा तालुक्यातील जपतलाई येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. आश्रमशाळेच्या वसतिगृहात झोपलेल्या विद्यार्थिनींना सर्पदंश झाल्याने तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाला आहे. तर आणखी तीन विद्यार्थिनींवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.

ही घटना रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास जपतलाई येथील कुप्पा लिंगो शैक्षणिक व सांस्कृतिक विकास संशोधन शाळा तथा अनुदानित आदिवासी आश्रमशाळेच्या वसतिगृहात घडली.

मृतांमध्ये आठ वर्षांच्या विद्यार्थिनीचाही समावेश

या दुर्घटनेत सुश्मिता सरोजित मंडल (१४), दीपिका एतवा लकडा (१२) आणि अनु गजुराम कोरेटी (८) या तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाला.

तर दीपिका बिटलूरसाय मडावी (११), समृद्धी सुरेश नैताम (१४) आणि कविता राजकुमार किरंगा (१२) या विद्यार्थिनींवर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

खाटांची कमतरता; विद्यार्थिनी जमिनीवर झोपल्या होत्या

प्राथमिक माहितीनुसार, वसतिगृहात सर्व विद्यार्थिनींसाठी पुरेशा खाटा उपलब्ध नसल्याने काही विद्यार्थिनी जमिनीवर गाद्या अंथरून झोपत होत्या. मध्यरात्री झोपेत असतानाच सापाने काही विद्यार्थिनींना दंश केला.

घटना लक्षात येताच संबंधित विद्यार्थिनींना तातडीने उपचारासाठी हलविण्यात आले. मात्र, तीन विद्यार्थिनींचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला.

आश्रमशाळेच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्न

या घटनेनंतर आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वसतिगृहातील निवास व्यवस्था, स्वच्छता, सर्पप्रतिबंधक उपाययोजना तसेच आपत्कालीन परिस्थितीत तातडीने वैद्यकीय मदत मिळण्याची व्यवस्था याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

 


#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Ok, Go it!
To Top
-->