![]() |
| जिल्ह्यातील पूर परिस्थितीमुळे आज हे मार्ग बंद |
Gadchiroli Flood Updates: मागील 3 दिवसापासून सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील जनजीवन पूर्णपणे विस्कळित झाले आहे. आज सकाळी सुमारे 08.00 वा. वाजताच्या सुमारास 11 प्रमुख मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. काही भागांत रस्त्यांवरून पाणी वाहत असल्याने वाहनचालक व नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. Gadchiroli Flood Updates:
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, विशेषतः पूल आणि नाल्यांवरून पाणी वाहत असताना त्या ठिकाणी जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे. पुराच्या पाण्याचा वेग अनपेक्षितरीत्या वाढू शकतो, त्यामुळे सुरक्षितता राखणे अत्यावश्यक आहे.
नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून आपले व कुटुंबाचे संरक्षण करावे, तसेच अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
पुरामुळे बंद असलेले मार्ग दि. 20.08.2025
वेळ सकाळी 08.00 वा.
1) हेमलकसा भामरागड राष्ट्रीय महामार्ग-130 डी (पर्लकोटा नदी) तालुका भामरागड
2) सिरोंचा असरअली जगदलपूर रस्ता राष्ट्रीय महामार्ग-63 (सोमनपल्ली नाला) तालुका सिरोंचा
3) अहेरी वटरा रस्ता राज्यमार्ग 370 (वटरा नाला)ता. अहेरी
4) चौडमपल्ली चपराळा रस्ता प्रजिमा-53 स्थानिक नाला) तालुका चामोर्शी
5) शंकरपूर ते विठ्ठलगाव रस्ता प्रजिमा-1 तालुका देसाईगंज
6) कोकडी ते तुलशी रस्ता प्रजिमा -49 तालूका देसाईगंज
7) कोंढाळा कुरुड वडसा रस्ता प्रजिमा-47 तालुका देसाईगंज
8) भेंडाळा बोरी गणपूर रस्ता प्रजिमा-17 (हळदीमाल नाला
9) हलवेर ते कोठी रस्ता इजीमा-24 तालुका भामरागड
10) मनेराजाराम ते दामरंचा रस्ता (बांडिया नदी) तालुका भामरागड
11) कोपेला झिंगानूर रस्ता तालुका सिरोंचा



कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.