![]() |
जिल्ह्यातील पूर परिस्थितीमुळे आज हे मार्ग बंद |
Gadchiroli Flood Updates: मागील दोन दिवसापासून सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील जनजीवन पूर्णपणे विस्कळित झाले आहे. आज दुपारी सुमारे 12.00 वा. वाजताच्या सुमारास सहा प्रमुख मार्ग बंद झाले होते. मात्र, दुपारपर्यंत पावसाचा जोर अधिकच वाढल्यामुळे आता एकूण दहा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. काही भागांत रस्त्यांवरून पाणी वाहत असल्याने वाहनचालक व नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. Gadchiroli Flood Updates:
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, विशेषतः पूल आणि नाल्यांवरून पाणी वाहत असताना त्या ठिकाणी जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे. पुराच्या पाण्याचा वेग अनपेक्षितरीत्या वाढू शकतो, त्यामुळे सुरक्षितता राखणे अत्यावश्यक आहे.
नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून आपले व कुटुंबाचे संरक्षण करावे, तसेच अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
पुरामुळे बंद असलेले मार्ग दि. 26.07.2025
वेळ दुपारी 02.00 वा.
- 1) सिरोंचा असरअली जगदलपूर रस्ता राष्ट्रीय महामार्ग-63 (वडधम गावादरम्यान) ( हलक्या वाहनाकरिता वाहतूक सुरू आहे. जड वाहतूक बंद) तालुका सिरोंचा
- 2) अहेरी वटरा रस्ता राज्यमार्ग 370 (वटरा नाला)तालुका अहेरी
- 3) कुरखेडा वैरागड रस्ता (सती नदी) राज्यमार्ग-377 तालुका कुरखेडा
- 4) वैरागड पतनवाडा दरम्यान (स्थानिक नाला) राज्यमार्ग-377 तालुका आरमोरी
- 5) कोरची बोटेकसा रस्ता राज्यमार्ग-314 (भिमपूर नाला) तालुका कोरची
- 6) कढोली ते उराडी रस्ता प्रजिमा-7, तालुका कुरखेडा
- 7) तळेगाव पळसगड चारभट्टी रस्ता प्रजिमा-46 तालुका कुरखेडा
- 8) मालेवाडा खोब्रामेंढा रस्ता प्रजिमा -4 तालुका कुरखेडा
- 9) कुरखेडा देलनवाडी रस्ता प्रजिमा-8 तालुका कुरखेडा
- 10) मांगदा कलकुली रस्ता प्रजिमा-50 तालुका कुरखेडा