चंद्रपूर जिल्ह्यात आज येलो अलर्ट; ढगफुटी व मुसळधार पावसाची शक्यता | Batmi Express

Be
0
Chandrapur Heavy Rain,Chandrapur Rain,Chandrapur News,Chandrapur,Bramhapuri,Vidarbha,Nagpur,
तात्काळ नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश

Ø जिल्हाधिकाऱ्यांचे सर्व तहसीलदार व संबंधित यंत्रणेला निर्देश

चंद्रपूर, दि. 19 : भारतीय हवामान खात्याच्या प्रादेशिक हवामान केंद्र, नागपूर यांनी चंद्रपूर जिल्ह्यासाठी आज (दि. 19)रेड अलर्ट” तसेच उद्या (दि. 20) “येलो अलर्ट जारी केला आहे. या पार्श्वभूमीवर काही भागात ढगफुटीसदृष्य परिस्थिती निर्माण होऊन मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

गेल्या दोन दिवसांत झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे शेती, घरे आणि इतर मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे प्राथमिक अहवालातून समोर आले आहे. या परिस्थितीत जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष विनय गौडा यांनी महसूल व वन विभागाच्या अधिकाऱ्यांना तात्काळ नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.

तसेच, जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि प्रशासनाशी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Ok, Go it!
To Top
-->