BGMI खेळताना पंप हाउसमध्ये पडून युवकाचा मृत्यू | Batmi Express

BGMI,BGMI News,BGMI Today News,BGMI Live News,Nagpur,nagpur news,Nagpur Today,Nagpur LIve,

BGMI,BGMI News,BGMI Today News,BGMI Live News,Nagpur,nagpur news,Nagpur Today,Nagpur LIve,

नागपूर :
 पहाटेच्या सुमारास नाश्ता करण्यासाठी निघालेल्या विद्यार्थ्याचा पबजी (PUBG/ BGMI) खेळण्याच्या नादात दुर्दैवी मृत्यू झाला. अंबाझरी तलावाच्या पंप हाउसच्या होलमध्ये पडून तो बुडाला. पुलकीत राज शहदादपुरी (१६) असे मृताचे नाव आहे. वाढदिवसादिवशीच त्याच्यावर हा दुर्दैवी मृत्यू ओढवला.

मंगळवारी पहाटे चारच्या सुमारास राज हा त्याचा मित्र ऋषी खेमानी (१७) याच्यासोबत नाश्ता करण्यासाठी शंकरनगरला गेला होता. दुकान उघडायचे असल्याने आता काय करावे या विचारातून ते टाइमपास करण्यासाठी अंबाझरी तलावाजवळ पोहोचले. तेथील पंप हाउसजवळ बसून ते दोघेही पबजी हा मोबाइल गेम खेळू लागले. गेम खेळून झाल्यावर ते परत निघाले असता पुलकीतला पंप हाउसचे होल दिसलेच नाही व तो त्यात पडला. तेथील पाण्यात तो बुडाला. ऋषीने माहिती दिल्यानंतर पोलिसांनी धाव घेत त्याला बाहेर काढले आणि इस्पितळात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.