Accident: देवरी जवळ मालवाहकाची झाडाला धडक : एक ठार तर इतर जखमी | Batmi Express

Be
0

Gondia,Gondia Accident,gondia news,Gondia Today,Gondia Live,Deori,

गोंदिया : 
देवरी पासून दक्षिणेला ८ किलोमीटर अंतरावर चिचगड- देवरी महामार्गावर असलेल्या कलचुवाच्या शिवारात एका मालवाहकाने रस्त्याच्या कडेला असलेल्या बेहड्याच्या झाडाला दिलेल्या धडकेत एक जण जागीच ठार तर इतर जण जखमी झाल्याची घटना आज दुपारी बाराच्या सुमारास घडली. सदर घटनेचा देवरी पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

माहितीनुसार, चिचगडकडून देवरीच्या दिशेने भरधाव येणाऱ्या मालवाहू मोटार (क्र. एमएच ४२-एम-४६९८) च्या चालकाचे वाहनावरील नियंंत्रण सुटल्याने रस्त्याचे कडेला असलेल्या बेहड्याच्या झाडाला जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये मोटारीत असलेल्या एका मजूराचा जागीच मृत्यू झाला तर इतर जण गंभीर रीत्या जखमी झाल्याचे प्रत्यक्षदर्शीचे म्हणणे आहे. 

जखमींना पुढील उपचारासाठी देवरीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पुढील तपास देवरी पोलिस करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Ok, Go it!
To Top
-->