Kisan Samman Nidhi: राजस्थान सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी किसान सन्मान निधी 2000 रुपयांनी वाढवण्याची घोषणा केली आहे. आता राजस्थानमध्ये किसान सन्मान निधी म्हणून 8000 रुपये दिले जातील. आम्ही दिलेली आश्वासने आता पूर्ण होत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्याच्या एक दिवस आधी ही मोठी घोषणा करण्यात आली आहे. एनडीएला बहुमत मिळाल्यानंतर शुक्रवारी नरेंद्र मोदींना पुढचे सरकार स्थापन करण्यासाठी आघाडीतील सर्व पक्षांचा पाठिंबा मिळाला. नरेंद्र मोदी रविवारी तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान होणार आहेत.
'अन्नदाता-उत्थान' के संकल्प पर सतत गतिशील...
— Bhajanlal Sharma (Modi Ka Parivar) (@BhajanlalBjp) June 8, 2024
प्रदेश सरकार द्वारा किसानों के समग्र उत्थान की दिशा में पीएम किसान सम्मान निधि में 2 हजार रुपए की वृद्धि की गई। जिससे किसानों के लिए केंद्र सरकार की 6 हजार रूपए की सालाना राशि बढ़कर अब हुई 8 हजार रूपए
अन्नदाताओं के सर्वांगीण उन्नयन… pic.twitter.com/pZzO2bxPIX
मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी सोशल मीडियावर घोषणा केली
मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिले त्यामुळे शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारची वार्षिक रक्कम 6 हजार रुपयांवरून 8 हजार रुपये झाली आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी हा निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या अतिरिक्त पैशातून शेतकऱ्यांना आधार मिळणार आहे. ते म्हणाले की, सरकार शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी मिशन मोडमध्ये काम करत आहे.
पेरणीचा हंगाम सुरू होण्यापूर्वी घेतलेला निर्णय
पेरणीचा हंगाम सुरू होण्यापूर्वीच घेतलेल्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाची लाट उसळली आहे. मान्सूनचे आगमन होताच संपूर्ण देशात पेरणीला सुरुवात होईल. या रकमेमुळे त्यांना बियाणे आणि खते खरेदी करणे सोपे होणार असल्याचे राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी सांगितले.