गोंदिया :- हैदराबादहून मध्यप्रदेशातील लांजीकडे मजुरांना घेऊन जाणाऱ्या एका खासगी ट्रॅव्हल्सला आज,सोमवारी दिनांक-10 जून रोजी गोंदिया-गोरेगाव राष्ट्रीय महामार्गावरील गोरेगाव तालुक्यातील मिलटोली गावाजवळ भीषण अपघात झाला.या घटनेत 1 मजूर ठार, तर 17 जण जखमी झाले. जखमींपैकी 11 जणांची प्रकृती गंभीर आहे.
थानसिंग यादव वय 30, रा.रेलवाडी जि.बालाघाट, मध्यप्रदेश असे मृताचे नाव आहे.या प्रकरणी गोंदिया ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून ट्रॅव्हल्स चालक मोहित उमाप्रसाद किरसान (रा.उगली / शिवनी म.प्र.)यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार,हैदराबादवरून 50 ते 60 मजुरांना घेऊन हैदराबादहून लांजीकडे जाणाऱ्या पायल ट्रॅव्हल्सच्या चालकाचे मिलटोली परिसरात ट्रॅव्हल्सवरील नियंत्रण सुटले.त्यानंतर बस रस्त्यालगतच्या राईस मिलच्या मजुरांच्या क्वार्टरला धडकली.त्यात चालकासोबत कॅबिनमध्ये बसेले 12 जण जखमी झाले.त्यांना गोंदिया स्थित केटीएस सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.