HSC & SSC 2024 Result [Date]: बारावीचा निकाल 21 किंवा 22 मे रोजी जाहीर होणार, तर दहावीचा निकाल या तारखेला लागणार ? | Batmi Express

HSC 2024,SSC 2024 Result,HSC 2024 Exam News,Maharashtra HSC Result 2024,HSC Result,Education,HSC Result 2024,SSC 2024,HSC 2024 Result Updates,
HSC 2024,SSC 2024 Result,HSC 2024 Exam News,Maharashtra HSC Result 2024,HSC Result,Education,HSC Result 2024,SSC 2024,HSC 2024 Result Updates,

Maharashtra Board 10th 12th Result 2024 Update: 10वी, 12वीच्या परीक्षा यशस्वीपणे पार पाडल्यानंतर, महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE), पुणे आता दोन्ही कक्षा च्या निकाल जाहीर करण्याचे काम करत आहे. इयत्ता बारावीचा निकाल 21 किंवा 22 मे रोजी जाहीर करण्याची तयारी बोर्डाने केली आहे. निकालाची अंतिम तारीख पुढील दोन दिवसांत जाहीर होईल, असे बोर्डातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. महाराष्ट्र बोर्डाने यावर्षी 1 ते 26 मार्च 2024 या कालावधीत इयत्ता दहावीच्या परीक्षा घेतल्या. तर बारावीच्या परीक्षा 1 फेब्रुवारी ते 19 मार्च 2024 या कालावधीत पार पडल्या. बारावी परीक्षेसाठी महाराष्ट्रातील 15 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून दहावीसाठी 16 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. 

महाराष्ट्र बोर्ड पत्रकार परिषदेद्वारे हे निकाल आणि टक्केवारी जाहीर करेल आणि निकाल जाहीर झाल्यानंतर निकालाची लिंक mahresult.nic.in, msbshse.co.in आणि hscresult.mkcl.org या अधिकृत वेबसाइटवर विद्यार्थी आपलं निकाल बघू शकतील तसेच बातमी एक्सप्रेस आणि एक्साम हेल्पर वर सुद्धा निकाल एमडेड केलं जाईल. 

महाराष्ट्र बोर्डाच्या 10वी, 12वीचा निकाल 2024 जाहीर झाल्यानंतर, विद्यार्थी त्यांचा निकाल अधिकृत वेबसाइटवर पाहू शकतात. निकाल तपासण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांचा हॉलतिकीट वरच बोर्ड रोल नंबर आणि आईचे  नाव टाकावे लागेल. MSBSHSE ने 1 ते 26 मार्च दरम्यान 10वी आणि 21 फेब्रुवारी ते 19 मार्च दरम्यान इयत्ता 12वीच्या परीक्षा महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने परीक्षा घेतल्या आहेत.


इयत्ता बारावीचा निकाल कधी लागणार ?

इयत्ता बारावीचा निकाल 21 किंवा 22 मे रोजी जाहीर करण्याची तयारी बोर्डाने केली आहे. 

महाराष्ट्र बारावीचा निकाल 2024 कसा तपासायचा:

  • बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर (www.maharesult.nic.in / Exam Helper HSC RESULT - By BE) जा आणि होमपेजवरील इयत्ता 12वीच्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा.
  • तुमचा रोल नंबर आणि/किंवा नोंदणी क्रमांक टाका.
  • तपशील सबमिट करा आणि तुमचा निकाल तपासा.
  • भविष्यातील वापरासाठी निकाल पृष्ठाची प्रिंटआउट घ्या.

विद्यार्थी बारावीचा निकाल खालील संकेतस्थळावर पाहू शकतात:

  • mahahsscboard.in
  • exam helper hsc result
  • www.maharesult.nic.in
  • msbshse.co.in
  • hscresult.11thadmission.org.in
  • hscresult.mkcl.org


इयत्ता दहावीचा निकाल कधी लागणार ?

इयत्ता दहावीचा निकाल 30 किवा 31 मे रोजी निकाल जाहीर होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 

महाराष्ट्र SSC चा निकाल 2024 कसा तपासायचा:

  • बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर जा आणि होमपेजवरील इयत्ता 10वी /12वीच्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा.
  • तुमचा रोल नंबर आणि/किंवा नोंदणी क्रमांक टाका.
  • तपशील सबमिट करा आणि तुमचा निकाल तपासा.
  • भविष्यातील वापरासाठी परिणाम पृष्ठाची प्रिंटआउट घ्या.

विद्यार्थी दहावीचा निकाल खालील वेबसाइटवर पाहू शकतात:

  • mahahsscboard.in
  • exam helper hsc result ( Updated Soon)
  • www.maharesult.nic.in
  • msbshse.co.in
  • hscresult.11thadmission.org.in
  • hscresult.mkcl.org


महाराष्ट्र 10वी, 12वी चा निकाल 2024 कसा तपासायचा?

स्टेप  1: mahresult.nic.in वर अधिकृत वेबसाइट तपासा.

स्टेप 2: मुख्यपृष्ठावर, महाराष्ट्र SSC, HSC निकाल 2024 साठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

स्टेप 3: आवश्यक क्रेडेन्शियल्स प्रविष्ट करा जसे की रोल नंबर आणि आईचे नाव. 'सबमिट' बटणावर क्लिक करा.

स्टेप 4: महाराष्ट्र बोर्ड 10वी, 12वी चा निकाल 2024 स्क्रीनवर प्रदर्शित केला जाईल.

स्टेप 5: तुमचं निकाल डाउनलोड करा किंवा प्रिंटआउट घ्या.


अनुत्तीर्णची जुलैमध्ये पुरवणी परीक्षा

इयत्ता दहावी- बारावीच्या बोर्ड परीक्षांमध्ये अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा जुलैमध्ये लगेचच घेतली जाते. निकालापासून साधारणतः एक महिना त्यांना अभ्यासासाठी मिळतो. पुरवणी परीक्षेचा निकाल काही दिवसांतच जाहीर केला जातो, या परीक्षेला फार विद्यार्थी नसतात. दरम्यान, पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये, त्यांनाही त्याच वर्षी पुढचे शिक्षण घेता यावे म्हणून पुरवणी परीक्षा निकालानंतर तातडीने घेतली जाते, असेही बोर्डातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.