Murder Breaking! पतीने झोपलेल्या पत्नीवर धारदार कुऱ्हाडीने मारून केली हत्या; बेतकाठी गावातील थरारक घटना | Batmi Express

Korchi,Korchi News,Korchi Today,Korchi Murder,Murder,Gadchiroli,Gadchiroli Murdered,Korchi Crime,
Korchi,Korchi News,Korchi Today,Korchi Murder,Murder,Gadchiroli,Gadchiroli Murdered,Korchi Crime,

  • कुऱ्हाडीने 3 वेळा वार करून पतीने आपल्या पत्नीचे मुंडके केले धडावेगळे
  • पत्नीची हत्या करून पती गावात फिरत असताना मोठ्या भावानी गावातील युवकांनासोबत पकडून घरात ठेवलं बांधून 

कोरची: कोरची तालुक्यापासून दहा किलोमीटर अंतरावर येत असलेल्या बेतकाठी गावातील रोजी-मजुरी करणाऱ्या एका कुटुंबातील पतीने घरगुती वादातून राहत्या घरात झोपून असलेल्या पत्नीच्या मानेवर तीन वेळा धारदार कुऱ्हाडीने सपा-सप मारून हत्या केल्याची थरारक घटना बुधवारी पहाटे 3 वाजता दरम्यान घडली आहे. 

Korchi MurderKorchi Murder News Korchi Murder Today

 मृतक पत्नीचे नाव अमरोतीन रोहिदास बंजार वय 33 वर्ष रा. बेतकाठी आहे तर हत्या करणाऱ्या आरोपी पतीचे नाव रोहिदास बिरसिंग बंजार वय 37  वर्षे रा. बेतकाठी असे आहे. प्राप्त माहितीनुसार अनेकदा या दोघामध्ये किरकोळ वाद होत असल्याचे शेजारील नागरिकांनी सांगितले. तर आरोपी हा एक दिवसापूर्वीच कुऱ्हाडीला धार लावत असल्याचे काही नागरिकांनी बघितले होते. बुधवारच्या पहाटे पत्नीला कुऱ्हाडीने मारून आरोपी पती रोहिदास कुऱ्हाड हातात पकडून बेतकाठी गावातील मुख्य बाजार चौकात फिरायला गेला. गावात एका ठीकाणाहुन दारु पिऊन पुन्हा घरी येऊन पत्नीला कुऱ्हाडीने मारले असे तीन वेळा तिच्या मानेवर मारले यामध्ये मृतक पत्नी अमरोतीन हिचा शरीरापासून तिचा डोकं वेगळं व्हायला थोडंच बाकी राहिला होता. आणि तिच शव राहत्या घरातील झोपलेल्या खाटेच्या बाजूला खाली जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत पडलेला होता.

आरोपीला चार मुली असून त्यापैकी सर्वात लहान मुलगी वैशाली घटनास्थळी उपस्थित होती तिचा रडण्याचा आवाजामुळे शेजारीच झोपलेला आरोपीचा मोठा भाऊ नोहरसिंग बिरसिंग बंजार धावत येऊन घरात बघितलं तर अमरोतीन बंजार ही मृत अवस्थेत दिसून आली. यानंतर आरोपी लहान भाऊ गावात हातात कुऱ्हाड पकडून फिरत असल्याची माहिती काही जणांनी मोठ्या भावाला दिली आरोपीने लगेच धारदार कुऱ्हाडीला पाण्याने धुवून घरामागील वाडीच्या मागे झुडुपात फेकुन दिल होत त्यानंतर मोठ्या भावाने गावातील दोन तीन युवकांसोबत आरोपी पकडून घरात आणले आणि घरातील अंगणाच्या एका ढेरणीला हात पाय बांधून खुर्चीत बसवून ठेवले होते.

या घटनेची माहिती गावात पसरताच गावातील लोकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली होती घरात बांधून ठेवलेल्या आरोपीला गावकऱ्यांनी विचारले तर मला काही समजले नाही, काही कळाले नाही, माझ्या डोळ्यासमोर लाल लाल अंधार आलं आणि मी माझ्या पत्नीला मारल्याचे कबूल केले पण नेमकं मारण्याचा कारण आरोपीने सांगितले नाही. गावातील नागरिकांनी 108 रुग्णवाहिका बोलावुन घेतली होती या रुग्णवाहिकेमध्येच मृतक अमरोतीन व आरोपी रोहिदास बंजार यांना टाकून कोरचीला आणले. आरोपीला कोरची पोलीस ठाण्यात सोडून मृतक अमरोतीनला ग्रामीण रुग्णालयात सविच्छेदनासाठी नेण्यात आले आहे. कोरची पोलीस स्टेशन येथे आरोपीला अटक करून पुढील कारवाई ठाणेदार चंद्रकांत वाबळे हे करीत आहेत.

चार मुलींच्या भविष्याचं पुढे काय ?

आईची हत्या वडीलांनीच केली त्यामुळे वडील पोलीस ठाण्यात गेले बंजार कुटुंबातील चार मुलींच्या भविष्याचं आता काय होणार असा प्रश्न गावातील अनेक नागरिकाना पडला आहें. पंधरा वर्षाची माधुरी नववीत, 13 वर्षाची मनीषा सातवीत, 11 वर्षाची कौशल्या पाचवीत, 8 वर्षाची वैशाली दुसरीत शिक्षण घेत आहेत. आई-वडील रोजी मजुरी करून यांचा शिक्षण पूर्ण करित होते सोबतच घरातील संसाराचा गाळाही चालवीत होते. या मुलींवर आता दुःखाचे डोंगर कोसळले आहे.

प्रतिक्रिया

आरोपीने काही कारण अजूनही सांगीतल नाही ब्याड ब्याड बोलतोय नेमके पत्नीला कोणत्या कारणांमुळे मारले सांगत नाही शांत शांत राहत आहें. सध्या एफ़ आय करने सुरू आहें.

चंद्रकांत वाबळे - पोलीस निरीक्षक 

पोलीस स्टेशन कोरची

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.