नागभीड हत्याकांड! कुटुंब प्रमुखाकडून दोन मुलींसह पत्नीची हत्या | Batmi Express

नागभीड हत्याकांड,Nagbhid Massacre,Nagbhid,Nagbhid Crime,Nagbhid News,Nagbhid Live,Nagbhid Today,Chandrapur,Chandrapur Crime,Chandrapur Murder,Murder

नागभीड हत्याकांड,Nagbhid Massacre,Nagbhid,Nagbhid Crime,Nagbhid News,Nagbhid Live,Nagbhid Today,Chandrapur,Chandrapur Crime,Chandrapur Murder,Murder
नागभीड हत्याकांड!

चंद्रपूर : 
कुटुंब प्रमुखाने गाढ झोपेत असलेल्या दोन मुली आणि पत्नीची कुऱ्हाडीने हत्या केली. मुलगा पहाटे घराबाहेर जाताच हे हत्याकांड घडल्याचे बोलले जात आहे. ही थरारक घटना आज रविवारी ३ मार्च रोजी पहाटे ४ वाजताच्या दरम्यान नागभीड तालुक्यातील मौशी येथे घडली. घटना उघडकीस येताच एकच खळबळ माजली आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. (नागभीड हत्याकांड)

माहितीनुसार, अंबादास लक्ष्मण तलमले असे या निर्दयी कुटुंब प्रमुखाचे नाव आहे. अलका अंबादास तलमले (४२) पत्नीचे तर प्रणाली अंबादास तलमले (२२) आणि तेजस्वीनी अंबादास तलमले (२०) अशी मुलींची नावे आहेत. मुलगा अनिकेत (१८) हा पहाटे ४ वाजता कामासाठी घराबाहेर गेला होता, म्हणून तो वाचला, अशी माहिती आहे. 

हे देखील वाचा:

सदर बाब सकाळी उघड होताच गावकऱ्यांनी घरासमोर एकच गर्दी केली होती. घटनेची माहिती नागभीड पोलिसांना देण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.