भंडारा(तुमसर) :- प्रेमाचे वय ठरलेले नसते; कधी कुणावर प्रेम होणार हे सांगता येणार नाही. मुलगा वा मुलगी कितीही मोठे झाले तरीही आई-वडिलांसाठी ते लहानच असतात.मात्र हल्ली प्रेमाची परिभाषा तसेच प्रेम करणे अवघड झाल्याचे दिसून येत आहे. कारण की आपण ज्याच्यावर जीवापाड प्रेम करतोय; अशा व्यक्तींना दुखापत वा जराशीही इजा झाल्यास मन व काळीज फाटल्या सारखे होते.मात्र हल्ली वेगळेच दिसून येत आहे.असाच प्रकार हल्ली निदर्शनास आला आहे.
‘तू माझ्याशी बोलत का नाही, तुझे म्हणणे काय आहे’, या कारणावरून घरात शिरून महिलेवर व तिच्या अल्पवयीन मुलीवर विश्वास चंद्रिकापुरे याने हल्ला केल्याची बाब उघडकीला आली आहे.या हल्ल्याप्रकरणी विश्वासला शनिवारी अटक करण्यात आली.प्रेम प्रकरणातून चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची घटना शुक्रवारी दुपारी १:३० वाजेच्या सुमारास शहरातील दुर्गानगर येथे घडली होती.दाखल तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला.काल,शनिवारी विश्वास सुरेंद्र चंद्रिकापुरे वय २४ वर्षे याला अटक करीत न्यायालयासमक्ष हजर करण्यात आले.न्यायालयाने ४ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.घरात बसलेल्या महिलेवर व तिच्या अल्पवयीन मुलीवर विश्वासने पॅन्टच्या खिशातून चाकू काढून अल्पवयीन मुलीवर मारण्यास धावला.मुलीच्या आईने प्रतिकार केला असता तिच्या गळ्यावर चाकू मारुन गंभीर जखमी केले. मुलगी भीतीने घरासमोर पळाली असता विश्वास हा तिच्या मागे धावून शेजारच्या घरी जाऊन मुलीच्या डाव्या पायाला चाकू मारून जखमी केले.त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.