मुलचेरा : तालुक्यातील मुलचेरा - घोट मार्गावर धावत्या बसने अचानक पेट घेतला. गडचिरोली आगार ची एम एच- ०७ सी- ९३१६ बस दररोज मुलचेरा येथे मुक्कामी येत असते आणि सकाळी ६ वाजता घोट - चामोर्शी मार्गे गडचिरोली जाते.
नेहमी प्रमाणे शुक्रवार १ मार्च रोजी मुलचेरा येथून घोट - चामोर्शी मार्गे गडचिरोली करिता निघालेल्या बसने मुलचेरा - घोट मार्गावर असलेल्या जंगलात अचानक बस च्या इंजिनमधून धूर निघत असल्याचे चालकांनी बघून बस थांबविली. अचानक बसने पेट घेतला असल्याचे निदर्शनास येताच प्रवाशांनी आपला जीव वाचविण्यासाठी बस बाहेर पडले. घाबरलेल्या अवस्थेत प्रवाशी जंगलाच्या दिशेने दूर जाऊन उभे झाले. चालक आणि वाहक देखील आपले सामान बाहेर काढून घेतले आणि झाडाच्या फांद्यानी आगीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. बस मध्ये एकूण सात ते आठ प्रवासी सवेत चालक आणि वाहक होते. प्राप्त माहितीनुसार आग हे बसच्या बॅटरी जडल्याने लागली होती.