Love Affair- Fights: मित्राच्या प्रेमप्रकरणाचा वाद! युवक गंभीर जखमी | Batmi Express

Nagpur,crime in nagpur,crime Nagpur,Nagpur news,Nagpur Today,Nagpur Crime,

Nagpur,crime in nagpur,crime Nagpur,Nagpur  news,Nagpur Today,Nagpur Crime,

नागपूर:- मित्राच्या प्रेम प्रकरणाचा वाद सोडविण्यासाठी गेलेल्या युवकावर तीन आरोपींनी विटा आणि तलवारीने वार केल्यामुळे युवक गंभीर जखमी झाला. ही घटना पाचपावली पोलिस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी रात्री १ वाजताच्या सुमारास घडली. दरम्यान पोलिसांनी हल्लेखोर तीन्ही आरोपींना गजाआड केले आहे.

रोहीत सुनिल नाहरकर (१८), श्याम बाबु कुसेरे (३०) आणि राजकुमार बंडु लाचलवार (२०) सर्वजण रा. पंचकुआ हनुमान मंदिराजवळ, पाचपावली अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर अभिषेक उर्फ भांजा संजय गुलाबे (२३, रा. तांडापेठ, मोचीपूरा हनुमान मंदीरा जवळ, पाचपावली) असे गंभीर जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. अभिषेकचा मित्र आशिष याचे एका मुलीवर प्रेम होते. त्यामुळे मुलीचा नातेवाईक असलेला रोहितसोबत आशिषचा वाद सुरु होता. त्यामुळे आशिषने आपल्या प्रेमप्रकरणाचा वाद मिटविण्यासाठी आपला मित्र अभिषेकला रोहितकडे पाठविले.

अभिषेक आपले चार मित्र घेऊन रोहितकडे पंचकुआ हनुमान मंदिराजवळ गेला. तेथे अभिषेकसोबत रोहित आणि त्याच्या दोन साथीदारांनी वाद घातला. त्यानंतर आरोपींनी संगणमत करून हातात विटा व तलवार घेऊन अभिषेकला जीवे मारण्याच्या हेतुने त्याच्या डोक्यावर, मानेवर, हातावर व छातीवर वार करून त्यास गंभीर जखमी केले. जखमी अवस्थेतील अभिषेकला मेयो रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. अभिषेकची आई रत्नमाला संजय गुलाबे (४१) यांनी दिलेल्या तक्रारीवरून पाचपावलीचे सहायक पोलिस निरीक्षक प्रविण सोमवंशी यांनी आरोपींविरुद्ध कलम ३०७, ३४, सहकलम ४ /२५, १३५ नुसार गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.