ब्रम्हपुरी (ता.प्र.):- तालुक्यापासून अवघ्या 2 किमी. अंतरावर असलेल्या मालडोंगरी येथे पतीनेच पत्नीची हत्या केल्याची घटना दि.12 फेब्रुवारी ला सकाळी उघडकीस आली. (Bramhapuri Murder)
प्राप्त माहितीनुसार सदर घटनेतील आरोपी जयदेव पिल्लेवान (60)रा.मालडोंगरी व मृतक पत्नी यांच्यात मागील 2-3 दिवसापासून रोज भांडण होत होते दरम्यान दि.11 फेब्रुवारी ला रात्री 11.00 वा दरम्यान फिर्यादी मजलग जॉकीस जयदेव पिल्लेवान (30)याला आरोपी व मृतक भांडण करताना दिसले.हे भांडण नेहमीचेच समजून फिर्यादीने लक्ष्य दिले नाही.मात्र सकाळी 7.00 वा जॅकीस ला त्याची आई हिरकण्या जयदेव पिल्लेवान (50) ही मृतावस्थेत पडलेली दिसली. त्यामुळे आरोपीने त्याला शिवीगाळ केल्याचे कारणावरून त्याचे पत्नीला हाताबुक्क्यांनी मारहाण केल्याने डोक्याला व चेहऱ्याला मार लागल्याने ती मरण पावली अशी माहिती पोलीस ठाण्यात दिली.
फिर्यादीच्या तक्रारीवरून आरोपी जयदेव पिल्लेवान वय (60)याचेवर अ.क्र. 71/24 कलम 302 भादवी नुस गुन्हा दाखल करून. आरोपीला अटक करण्यात अली.घटनेचा तपास पोलीस निरीक्षक अनिल जिट्टावार यांच्या मार्गदर्शनात ब्रम्हपुरी पोलीस करत आहेत.