Chandrapur Heavy Rain: अवकाळी पाऊस व गारपीटमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्या पालकमंत्री मुनगंटीवार यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश | Batmi Express

Chandrapur,Chandrapur News,Chandrapur Rain,Chandrapur Rain News,Chandrapur Today,Heavy Rain,Heavy Rain 2024,

 

Chandrapur,Chandrapur   News,Chandrapur Rain,Chandrapur Rain News,Chandrapur Today,Heavy Rain,Heavy Rain 2024,

त्वरीत पंचनामे करून अहवाल सादर करण्याच्या सुचना

चंद्रपूरदि. ११ : चंद्रपूर जिल्हयातील काही तालुक्यात शनिवारी (१० फेब्रु) झालेला अवकाळी पाऊस व गारपीटमुळे शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तत्काळ मदत उपलब्ध करून देण्याचे निर्देश राज्याचे वनेसांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकारी यांना दिले आहेत. 

१० फेब्रवारी रोजी जिल्ह्यातील वरोराभद्रावतीचंद्रपूरपोंभूर्णा या तालुक्यात अवकाळी पावसासह गारपीट तर  ब्रम्हपुरीनागभीडराजूराकोरपनामूल व इतर तालुक्यात अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे हरभरागहुतूरज्वारीजवस व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानीचे त्वरीत पंचनामे करून नुकसानग्रस्तांना तातडीने मदत देण्यात यावीअसे निर्देश मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. तसेच जिल्हा प्रशासनाने केलेल्या कार्यवाहीचा अहवाल पालकमंत्री कार्यालयालासुध्दा सादर करावाअशाही सूचना त्यांनी दिल्या.

आपदग्रस्तांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे असून कोणीही मदतीपासून वंचित राहू नयेअशा पद्धतीने कार्यवाही करण्याचे निर्देशही श्री. मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.