प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : गडचिरोली हद्दीतील मौजा दर्शनीमाल गावात ३० मे २०१८ रोजी फिर्यादी यांची पीडीत मुलगी ही आपले घरून दुपारी ०३.०० वाजताचे सुमारास घराशेजारी असलेल्या बाथरूममध्ये जाउन घरी येत असतांना, पीडीताचे आजोबा यांचे घराचे जवळ असलेल्या गोठ्याचे चाफ्यामध्ये यातील आरोपी अनिल कवड् मशाखेत्री (वय ४०) वर्ष रा. दर्शनीमाल याने लपुन बसुन पीडीता अल्पवयीन असल्याचे माहीत असुन ती घराकडे परत जात असतांना, पीडीतेच्या जवळ येउन, हात पकडुन व एक हात तिचे तोंडावर दाबुन, ओढत – ओढत जवळ असलेल्या घराच्या धाब्यावर नेऊन पीडीताचे अंगावरील कपडे काढून जबरी संभोग केला.
त्यामुळे पीढीता ही बेशुध्द पडल्याने, आरोपीने तीला गोठ्याजवळ असलेल्या संडासमध्ये डांबून ठेवले. पीडीता ही घरी न आल्याने फिर्यादीने गावात व इतरत्र पीडीतेचा शोध घेतला असता मिळून आली नाही. रात्रो अंदाजे ०८.३० वा दरम्यान फिर्यादीचा लहान मुलगा हा सायकल ठेवण्यासाठी घराजवळ असलेल्या गोठ्यामध्ये गेला असता. गोठ्याजवळ असलेल्या संडासमध्ये त्याला पीडीतेची पांढऱ्या रंगाची ओढनी दरवाज्यातून बाहेर दिसली असता सदर बाब ही फिर्यादीला सांगताच तिथे फिर्यादीने जाउन पाहीले असता पीडीता ही बेशुध्द झालेल्या. अवस्थेत मिळाली.
अशा फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट वरून पोस्टे गडचिरोली येथे ३१ मे २०१८ ला अप.क्र. २१७/२०१८ अन्वये कलम ३६३, ३७६ (२) (३), व ३४२ भादवी तसेच कलम ४ बाल लैंगीक अत्याचार अधिनियम, तसेच अनुसुचित जाती जमाती कायदयान्वये गुन्हा दाखल करून आरोपीस ३१ मे २०१८ रोजी अटक करून, तपास पूर्ण करून आरोपी विरुद्ध सबळ पुरावा मिळून आल्याने मा. न्यायालयात स्पेशल केस क्र. २८/२०१८ अन्वये दोषारोप दाखल करण्यात आले.
फिर्यादी व वैद्यकीय पुरावा, ईतर साक्षीदारांचे बयाण तसेच सरकारी पक्षाचा युक्तीवाद मा. न्यायालयाने ग्राहय धरून दिनांक ०५ ऑक्टोबर २०२३ रोजी आरोपी अनिल कवड़ मशाखेत्री (वय ४५) वर्ष रा. दर्शनीमाल यास विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश उत्तम एम. मुधोळकर गडचिरोली यांनी आरोपीस कलम ३६३, ३७६ (२) (३) व ३४२ भादवी तसेच कलम ४ बाल लैंगीक अत्याचार अधिनियम मध्ये दोषी ठरवुन २० वर्षे सश्रम कारावास व एक लाख रूपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. कलम ३ अनुसुचित जाती जमाती कायद्यान्वये पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली. दंडाची रक्कम पीडीतेला देण्याचा आदेश पारित करण्यात आला.
सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अनिल एस. प्रधान यांनी कामकाज पाहिले तसेच गुन्हाचा तपास एसडीपीओ डॉ. सागर कवडे व मपोउपनि / तेजस्वीनी संपत पाटील गडचिरोली यांनी केला. तसेच संबंधीत प्रकरणात साक्षदारांशी समन्वय साधुन प्रकरणाची निर्गती करीता कोर्ट पैरवी अधिकारी व कर्मचारी यांनी प्रयत्न केले.