ब्रम्हपुरी: चिखलगाव येथील अवैध रेती वाहतुक पुन्हा जोमात; प्रशासन करतो तरी काय! | Batmi Express

Chandrapur News,Chandrapur,Sand Smuggling,Bramhapuri,Bramhapuri Live,Chandrapur News Live,Chandrapur Today,Bramhapuri News,

Sand Smuggling,Chandrapur News,Chandrapur,Bramhapuri,Bramhapuri Live,Chandrapur News Live,Chandrapur Today,Bramhapuri News,

ब्रम्हपुरी : तालुक्यातील चिखलगाव येथे वैनगंगा नदीचे पूर ओसरले पण आज सकाळच्या सुमारास वैनगंगा नदी पात्रात अवैध रेती उपसा होत आहे. ट्रॅक्टर व इतर साधनांद्वारे रेतीचा पुरवठा मोठ्या प्रमाणावर केला जात असूनही महसूल विभाग दिसून न दिसल्यासारखे करीत असल्याने एवढे निद्रावस्थेत का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर प्रशासन आळा घालणार कधी? असा प्रश्न निर्माण झाला आहे. रेती तस्करांच्या मुजोऱ्या वाढण्यामागचे मुख्य कारण म्हणजे प्रशासन सुस्त तर रेती तस्कर मस्त; अशी परिस्थिती पहावयास मिळत असल्याने तालुक्यातील अनेक रेती घाट अवैध तस्करांच्या विळख्यात सापडले असल्याचे हल्ली सर्वत्र चित्र दिसून येत आहे.

चिखलगाव परिसरात पूर ओसरला आणि हे खोदकाम करण्यात येत आहे. रात्रीच्या वेळी ट्रॅक्‍टरचा वापर करून गावातील मुख्य रस्त्याने वडसा, ब्रम्हपुरी, सुरबोडी, जुनी वडसा ही अवैध रेती वाहतूक होत असल्याचे सांगितले जात आहे.

त्यामुळे 'तुम्ही माटवा आम्ही सांभाळू असे तर होत नसावे ना? वैनगंगा नदिपात्रात मोठ मोठे खड्डे पडले असुन एवढे डोळेझाक करणे म्हणजे पाणी कुठेतरी मुरले जात असावे; अन्यथा पाणी मुरण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. ही साधी आणि सरळ मनधरणा वा 'समजणे वाले को; खाली इशाराही काफी है' सदर अवैध रेती वाहतुकीला मंडळ अधिकारी व तलाटी यांचा आर्शीवाद असल्याचे बोलल्या जात आहे. जारावंडी जवळ बांदे नदि आहे. या नदितिल रेती उत्खनन करून राजरोसपणे तालुक्यातील विविध भागाकडेकडे रात्रौ वेळेस जात असुन वैनगंगा नदिपात्रात मोठ मोठे खड्डे पडले असुन रात्रोच्या वेळी अवैध रेतीची वाहतुक होत असल्याचे चिखलगाव गावात बोलल्या जात आहे. 

एवढी मोठी वाहतुक राजरोसपणे होत असतांना मंडळ आधिकारी व तलाटी डोळे मिटून बघत आहेत. तहसिदार एटापल्ली यांनी लक्ष देऊन अवैध रेती चोरीला आळा बसवावा अशी मागणी होत आहे.अवैध रेतीचा उपसा करून त्यातील पुरवठा परप्रातांत केला जातोय ही साधी बाब नसून यावर त्वरित आळा घालणे आवश्यक आहे.अन्यथा 'चोरी तर चोरी वर शिनाजोरी तसेच त्यांचीच मुजोरी' गावकऱ्यांना सहन करावी लागणार हे तितकेच सत्य आहे.

वैनगंगा नदी तालुक्यातील एकमेव मोठी नदी आहे. यंदाच्या पावसाळ्यात या नदीला महापूर आलं होत. जुन्या रपत्याची दुरुस्ती आजही झाली नाही. जानेवारीपासून नदीचा प्रवाह थांबल्याने अनेक ठिकाणी पात्र उघडे आहे. ही ठिकाणे आता वाळू माफियांचे लक्ष्य आहेत.

अवैध रेती तस्करीवर प्रशासनाकडून जोपर्यंत कठोर पावले उचलली जाणार नाही.तोपर्यंत सर्वत्र असेच चित्र दिसून येणार असल्याने प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.