फोटो न्यूज प्रदर्शित करीत आहे . (गॅलरी ) |
Nagpur Sex Racket : गेल्या अनेक दिवसांपासून तरुणी कडून नागपूरातील सावनेर तालुक्यातील लॉज आणि हॉटेलमध्ये वेश्याव्यवसाय सुरू होता. आरोपींकडून महाविद्यालयीन तरुणींची वापर सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
राज्याची उपराजधानी नागपुरातून खळबळजनक घटना समोर आली आहे. नागपूर पोलिसांनी धडक कारवाई करत एका हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा भांडाफोड केला आहे. जिल्ह्यातील सावनेरमधल्या रॉयल लॉजवर पोलिसांनी कारवाई केली असून त्यामध्ये दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. वेश्याव्यवसायासाठी आणलेल्या काही तरुणींची पोलिसांनी सुटका केली असून आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सावनेर तालुक्यातील अनेक भागातील ढाबे, हॉटेल आणि लॉजवर आरोपींकडून देहव्यापार सुरू असल्याची माहिती नागपूर पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर नागपूर पोलिसांनी सापळा रचून सावनेरातील रॉयल लॉजवर छापा मारला. यावेळी काही महाविद्यालयीन तरुणी आणि महिला लॉजमध्ये वेश्याव्यवसाय करताना पोलिसांना आढळल्या. याशिवाय काही आंबटशौकिन ग्राहकही लॉजमध्ये होते. पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. छापा मारल्यानंतर पोलिसांनी ज्या तरुणींची सुटका केली, त्यात काही तरुणी उच्चशिक्षित असल्याचं आढळून आलं आहे. खराब आर्थिक स्थितीमुळं संबंधित तरुणी वेश्याव्यवसायाकडे वळली. तिच्यासोबत आणखी काही महाविद्यालयीन तरुणी वेश्याव्यवसाय करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यानंतर आता पोलिसांनी सर्व तरुणींची सुटका करत त्यांना सुधारगृहात पाठवलं आहे. काही दिवसांपूर्वीच पुणे पोलिसांनी एका सेक्स रॅकेटचा पर्दापाश केला होता. त्यानंतर आता नागपुरातही पोलिसांनी वेश्याव्यवसाय करणाऱ्या आरोपींना अटक केल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.