मुल:- चंद्रपूर जिल्ह्यातील मूल शहरात 14 ऑक्टोबर ला रात्रीच्या सुमारास शेजाऱ्यांनी तिन महिन्याची गर्भवती महिलेला मारहाण केल्याची संतापजनक घटना घडली आहे, या प्रकरणात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राज्यात एकीकडे सरकार महिलांच्या सन्मानार्थ विविध योजनांचा पाढा वाचला जात आहे मात्र दुसरीकडे महिलांवर होणारे अत्याचार वाढतच आहेत, असाच एक संतापजनक प्रकार मूल शहरात उघडकीस आला.
शहरातील वॉर्ड क्रमांक 17 मध्ये राहणारे 27 वर्षीय आकाश बोर्डावार हे मोल मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत त्यांचा लग्न 6 महिन्यांपूर्वी दामिनी सोबत झाले, सध्या दामिनी ही 3 महिन्याची गर्भवती आहे.आकाश यांच्या घराशेजारी राहणारे राहुल प्रेमलवार त्यांच्यासोबत नेहमी कोनत्याही कारणाने होणारे वाद बघता आकाश बोर्डावार यांनी त्यांच्या सोबत बोलणे बंद केले होते . 14 ऑक्टोबर ला रात्री 11.30 वाजताच्या सुमारास राहुल प्रेमलवार, छोटू तोटावार, ईश्वर लोनबले व बादल बावनवाडे हे बोर्डावार यांच्या घरापुढे येऊन जोरजोरात ओरडत शिवीगाळी करू लागले तेव्हा दामिनी ने माझ्या घरापुढे येऊन का बरे शिवीगाळ करता असे विचारले असता त्या गर्भवती महिलेला या निर्दयी मानसांनी तिला नाहक मारहाण केली.
याप्रकरणी पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे