आरमोरी : शहरात दोन अपघातात तिघे जण ठार तर एक जण जखमी | Batmi Express

Gadchiroli News,Gadchiroli Accident,Gadchiroli,Gadchiroli Batmya,Armori,Armori Accident,Armori News,
Gadchiroli News,Gadchiroli Accident,Gadchiroli,Gadchiroli Batmya,Armori,Armori Accident,Armori News,

आरमोरी: मागील गेल्या ४८ तासात आरमोरी शहरात तब्बल दोन अपघात झाल आहेत. या दोन अपघातात ३ जण जागीच ठार तर १ जण जखमी झाला आहे. या दोन्ही घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त होत आहे. गडचिरोली मार्गावर घडलेल्या घटनेत दोघे जण जागीच ठार झाले तर बर्डी नजीक झालेल्या अपघातात १ जण ठार तर दुसरा जखमी झाला आहे. (Armori Accident)

आरमोरी वरून देऊळगाव येथे आपल्या स्वगावी भरधाव वेगाने जात असताना दुचाकी वाहनचालकाचा ताबा सुटल्याने दुचाकी झाडाला आढळल्याने झालेल्या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना काल दिनांक १७ ऑगस्ट रोजी रात्रौ १० वाजताच्या सुमारास आरमोरी- गडचिरोली मार्गावरील आरमोरी पासून २०० मीटर अंतरावर असलेल्या एस. के. लॉनजवळ घडली.
  • सुनील नामदेव बनपूरकर (५०) रा. देऊळगाव
  • सोमदत्त शामराव खांडकुरे (५०) रा. इंजेवारी
 अशी मृतकांची नावे आहेत.

आरमोरी : शहरात दोन अपघातात तिघे जण ठार:

प्राप्त माहितीनुसार, मृतक सोमदत्त शामराव खांडकुरे हा घरची दुचाकी वाहण क्र. २८- ३३* - ८५३३ एच.एफ. डिलक्स हिरो कंपनीची दुचाकी घेवून आरमोरी येथे जातो असे आपल्या पत्नीला सांगून सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास आरमोरीकडे निघून गेला. वाटेत त्याने इंजेवारी येथील सुनील नामदेव बनपूरकर याला सोबत घेऊन ते काही कामानिमित्त आरमोरीला आले होते. आरमोरी येथील कामे आटोपून रात्रौ १० वाजताच्या सुमारास हे दोघेही परत जात असताना वाहनचालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने आरमोरी पासून २०० मीटर अंतरावर असलेल्या त्यांच्या दुचाकीने झाडाला धडक दिल्याने झालेल्या अपघातात त्या दोघांचाही घटनास्थळी मृत्यू झाला. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून त्यांना उपजिल्हा रुग्णालय येथे भरती केले असता डॉक्टराणी त्यास मृत घोषित केले.  आरमोरी पोलिसांनी वहानचालकावर २७९, ३०४ (अ) नुसार गुन्हा दाखल केला असून अधिक तपास आरमोरी पोलीस स्टेशनचे ठाणेदार संदीप भांदवी मंडलिक यांचे मार्गदर्षनाखाली पोलीस हवालदार ठाकरे करीत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.