सिंदेवाही : दोन वाहनाची समोरासमोर जबर धडक, 9 जण जखमी | Batmi Express

Sindewahi,Chandrapur News,Chandrapur,Chandrapur Accident,Accident,Chandrapur Live,Accident News,Sindewahi News,Sindewahi Accident,

Sindewahi,Chandrapur News,Chandrapur,Chandrapur Accident,Accident,Chandrapur Live,Accident News,Sindewahi News,Sindewahi Accident,

सिंदेवाही : 
नवरगाव मार्गे चिमूर महामार्गावर स्कार्पिओ व मेटॅडोर गाडीची पेंढरी-मोटेगाव जवळ समोरासमोर धडक बसली. या अपघातात ४ व्यक्ती गंभीर तर ५ किरकोळ जखमी झाले. जखमींना सिंदेवाही रुग्णालयात हलविण्यात आले. सदर घटना रविवार १६ जुलैला दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली.

माहितीनुसार पेंढरी-मोटेगावजवळ असलेल्या वळणावर या दोन्ही वाहनांची समोरासमोर धड़क झाली. जखमीवर सिंदेवाहीत प्राथमिक उपचार करण्यात आले. चार रुग्ण गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचाराकरिता चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात रेफर करण्यात आले.

जखमींमध्ये तेजस सोमेश्वर कोंडेकर रा. खराडा, मंगेश जयराम खांडेकर रा. सरडपार, प्रदीप जयराम खांडेकर, रा. सरडपार, चंदा अनिल टिकले रा. जामसाळा, डिंपल अनिल टिकले रा. जामसाळा, शैलेश दयाराम चावरे रा. बामणी ता. बल्लारपूर, सहादेव शिवलाल राठोड रा. हिंगणा जि. नागपूर, भूमिका सोमेश्वर कोंडेकर रा. सरडपार, शिवशंकर अनिल टिकले रा. जामसाळा यांचा समावेश आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.