गोसीखुर्द धरणाचे 33 गेट 0.50 मी. ने उघडण्यात आले असून 1 लाख 39 हजार 990 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. गोसीखुर्द धरणाचे पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस पडत असल्यामुळे तसेच ऊर्ध्व भागातील वैनगंगा नदीवरील धापेवाडा बॅरेज मधून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात येनार असल्यामुळे गोसीखुर्द धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्याकरिता गोसीखुर्द धरणाचे 33 गेट 0.50 मी. ने उघडण्यात आले असून 1 लाख 39 हजार 990 क्युसेक पर्यंत विसर्ग टप्प्याटप्प्याने वाढविण्यात येईल तरी नदी पात्रात आवागमन करणाऱ्यांनी काळजी घ्यावी व सतर्क रहावे.
गोसीखुर्दच्या पाणलोट क्षेत्रात काल रात्रीपासून मुसळधार पावसाने भंडाऱ्याची जीवनदाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वैनगंगा नदीचे पात्र आता दुथडी भरून वाहू लागले आहे.
गोसीखुर्द धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्याकरिता पुढील काही तासात धरणाच्या विसर्गात पुन्हा वाढ होईल. तरी भंडारा जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आहेत. नदी काठांवर राहणारे आणि नदी पात्रातून ये जा करणाऱ्या नागरिकंनी काळजी घ्यावी, सतर्क रहावे, असे आवाहन धरण प्रशासनाने केले आहे.