नागभीड: घोडाझरी तलावाचा मनसोक्त आनंद लुटण्यासाठी संपूर्ण विदर्भातून पर्यटक या ठिकाणी येत आहेत. अश्यातच आज शेगाव येथील काही युवक चिमूर तालुक्यातील मुक्ताबाई येथे धबधब्याच्या आनंद घेण्यासाठी शेगाव येथून सकाळी दहा वाजता दरम्यान गेले होते, परंतु मुक्ताबाई धबधब्या परिसरामध्ये दोन दिवसा अगोदर डोमा येथील रहिवाशी डोमाजी सोनवणे यांच्या वाघाच्या हमल्यात मृत्यू झाल्याची घटना घडली.
आज मुक्ताबाई धबधबा वनविभाग तसेच पोलीस प्रशासनाकडून काही दिवसा करीता बंद करण्यात आला असल्याने सदर युवक हे मुक्ताबाई येथून नागभीड तालुक्यातील घोडाझरी तलाव येथे गेले असता सेल्फीच्या नादात एक जण घसरून पडले असता त्याला वाचवण्याच्या नादात तिघेजण पडले असुन चौघांचाही बुडून जागीच मृत्यू झाला आहे..
मृतांमध्ये मनीष श्रीरामे (२६),धीरज झाडें (२७), चेतन मांदाडे ( १७ ), संकेत मोडक (२५)चिमूर तालुक्यातील गिरोला येथील रहिवाशी आहे. घटनास्थळावर नागभीड पोलीस स्टेशन कर्मचारी उपस्थित असून शोध मोहीम कार्य सुरू आहे.