सोर्स: बातमी एक्सप्रेस AI
1. वैनगंगा नदी :
गोसीखुर्द धरणाचे 33 गेट 0.50 मी. ने उघडण्यात आले असून 1 लाख 39 हजार 990 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. गोसीखुर्द धरणाचे पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस पडत असल्यामुळे तसेच ऊर्ध्व भागातील वैनगंगा नदीवरील धापेवाडा बॅरेज मधून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात येनार असल्यामुळे गोसीखुर्द धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्याकरिता गोसीखुर्द धरणाचे 33 गेट 0.50 मी. ने उघडण्यात आले असून 1 लाख 39 हजार 990 क्युसेक पर्यंत विसर्ग टप्प्याटप्प्याने वाढविण्यात येईल तरी नदी पात्रात आवागमन करणाऱ्यांनी काळजी घ्यावी व सतर्क रहावे.
- चिचडोह बॅरेज चे 38 पैकी 38 गेट उघडलेले असुन विसर्ग 7,867 क्युमेक्स (2,77,823 क्युसेक्स) आहे.
- वडसा, वाघोली व आष्टी या सरीता मापन केंद्रावरील नोंदीनुसार वैनगंगा नदीची पाणी पातळी *इशारा पातळीच्या खाली* आहे.
2. वर्धा नदी :
निम्न वर्धा प्रकल्पाचे 31 पैकी 31 गेट बंद असुन विसर्ग निरंक आहे.
बामणी (बल्हारशा) व सिरपूर/सकमूर या सरीता मापन केंद्रावरील नोंदीनुसार वर्धा नदीची पाणी पातळी *इशारा पातळीच्या खाली* आहे.
3. प्राणहिता नदी :
महागांव सरीता मापन केंद्रावरील नोंदीनुसार प्राणहिता नदीची पाणी पातळी *इशारा पातळीच्या खाली* आहे.
4. गोदावरी नदी :
- श्रीपदा येलमपल्ली प्रकल्पाचे 62 पैकी 62 गेट बंद असुन विसर्ग निरंक आहे.
- लक्ष्मी बॅरेज (मेडीगड्डा) चे 85 पैकी 35 गेट उघडलेले असुन विसर्ग 3,520 क्युमेक्स (1,24,320 क्युसेक्स) आहे. बॅरेज ची पाणी पातळी 98.30 मी. असुन पूर्ण संचय पातळीच्या 1.70 मी. ने खाली आहे.
5. इंद्रावती नदी :
जगदलपूर, चिंदनार व पाथागुडम या सरीता मापन केंद्रावरील नोंदीनुसार इंद्रावती नदीची पाणी पातळी *इशारा पातळीच्या खाली* आहे.
पर्लकोटा* नदीची पाणी पातळी भामरागड सरीता मापन केंद्रावरील नोंदीनुसार *इशारा पातळीच्या खाली* आहे.
---
🟡 इशारा :
नद्यांच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे व गोसीखुर्द धरणातून विसर्ग सोडण्यात आल्याने वैनगंगा व प्राणहिता नदीची पाणी पातळी वाढलेली असुन गोदावरी नदीची पाणी पातळी सुद्धा वाढणार असल्याने नदी काठावरील गावातील नागरिकांनी उचित सतर्कता बाळगावी, तसेच नदी पात्रात आवागमन करणाऱ्यांनी आवश्यक काळजी घ्यावी.
---
हवामान संदेश :
🟠भारतीय हवामान विभागाचे नागपूर, हैद्राबाद, रायपूर व भोपाल केंद्र यांचे दिनांक 17.07.2023 रोजीच्या पर्जन्यमान इशारा संदेशानुसार पुढील 24 तासात वैनगंगा-प्राणहिता, वर्धा, इंद्रावती व मध्य गोदावरी उपखोऱ्यातील *काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार स्वरुपाच्या पावसाची शक्यता* असल्याचे संकेत दिलेले आहे. कृपया उचित दक्षता घ्यावी.