
सोर्स: बातमी एक्सप्रेस AI
भंडारा: गोसीखुर्द च्या पाणलोट क्षेत्रात मागील काही दिवसापासून अधून-मधून दमदार पावसाची हजेरी होत असल्याने गोसीखुर्द धरणाचे 33 पैकी 33 गेट अर्धा मीटरने उघडण्यात आले असून 3,749.85 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग वैनगंगा नदी पात्रात सुरु आहे. दुपारी 1 वाजताच्या सुमारास धरणातून विसर्गात पुन्हा वाढ करण्यात आलं आहे. सध्या गोसीखुर्द चे सर्व दरवाजे उघडले असल्याची माहिती आली. 33 दरवाज्यातून 3,749.85 क्युमेक्स पर्यंत पाणी विसर्ग वैनगंगा नदी पात्रात करण्यात येत आहे. आवशक्यता पडल्यास विसर्गात पुन्हा वाढ होईल - अशी शक्यता दर्शविण्यात्त येत आहे.
गोसीखुर्द धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्याकरिता पुढील काही तासात धरणाच्या विसर्गात पुन्हा वाढ होईल. तरी भंडारा जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आहेत. नदी काठांवर राहणारे आणि नदी पात्रातून ये जा करणाऱ्या नागरिकंनी काळजी घ्यावी, सतर्क रहावे, असे आवाहन धरण प्रशासनाने केले आहे.


कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.