बुलढाणा: आज दि: २९-७-२०२३ पहाटेच्या सुमारास आणखी दोन ट्रॅव्हल समोरासमोर जबर धडकेत सहा प्रवाश्यांचा जागीच मृत्यू तर जवळपास 30 प्रवाशी जखमी झाल्याची घटना घडली.
एका ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर शहरात तर दोन ट्रॅव्हल्सची आज दि: २९-७-२०२३ पहाटे तीन वाजताच्या सुमारास आमने-सामने जबर भीषण धडक झाली. सहा नंबरच्या हायवेवर झालेल्या या अपघातात 6 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. 25 ते 30 प्रवासी गंभीर जखमी झाले. समोरासमोर जबर धडक झाल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. जखमींना मलकापूर उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. एक ट्रॅव्हल हिंगोलीच्या दिशेने जात होती, तर दुसरी नागपूरहून नाशिकला चालली होती.