Breaking! वाघाच्या हल्ल्यात गुराखी गंभीर जखमी.! | Batmi Express

Mul,Chandrapur,Chandrapur Live,Chandrapur News,Tiger Attack,Chandrapur News IN Marathi,Chandrapur Tiger Attack,

Chandrapur,Mul,Chandrapur Live,Chandrapur   News,Tiger Attack,Chandrapur News IN Marathi,Chandrapur Tiger Attack,

चंद्रपूर
: जिल्ह्यातील मूल तालुक्यातील बेलगाटा येथे गुरे चरार्ईसाठी शेतात घेवुन गेलेल्या शेतकऱ्या- वर वाघाने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना बेलघाटा येथे घडली. सेवक सयाजी कोवे वय ५५ वर्षे रा. बेलघाटा असे वाघाच्या हल्लात जखमी झालेल्या शेतकऱ्याचे नांव आहे.

मूल तालुक्यातील मौजा बेलघाटा येथील शेतकरी सेवक सयाजी कोवे वय ५५ वर्ष हे बेलघाटा गावालगतच्या शेतात गुरे चराई करीत होते. दरम्यान दबा धरून बसलेल्या वाघाने दुपारी २ वाजताच्या सुमारास त्यांचावर हल्ला करुन गंभीर जखमी केले. ही बाब माहिती होताच परिसरातील ग्रामस्थांमध्ये घटनेची माहिती मिळताच घबराट निर्माण झाली असून सध्या धानरोवणीचे कामे सुरू आहेत. माहिती मिळताच वनरक्षक आर. व्ही. धनविजय, व वनरक्षक एस. डब्लू. बोनलवार व बेलघाटा चे पोलीस पाटील चंद्रशेखर येरमे यांनी घटनास्थळी जाऊन जखमी शेतकऱ्या ला मूल उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, प्राथमिक उपचारानंतर चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले. सदर घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.आणि वाघाच्या दहशतीत शेतीची कामे कशी करायची हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.