वडसा: सावंगी नदीपात्रात आढळला अनोळखी इसमाचा मृतदेह | Batmi Express

Be
0
wadsa,crime news,Gadchiroli,Crime,Wadsa News,Desaiganj,Gadchiroli Batmya,

वडसा (देसाईगंज) ३० जुलै : तालुक्यातील सावंगी येथील शांतीनगर जवळील नदी पात्रात चिखलाने माखलेल्या अवस्थेत अनोळखी इसमाचा मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ माजली आहे. गोसीखुर्द मधून दि: २८-७-२०२३ ला पाण्याचा विसर्ग वैनगंगा नदी पात्रता करण्यात आलं होत.


नदी पात्रात मृतदेह आला कुठून? 

मृतदेह  गोसीखुर्द पाण्याचा प्रवाहामधून वाहत आला असेल असा अंदाज व्यक्त करण्यात आलं आहे. 

नदी पात्रात मृतदेह असल्याची माहिती आज सकाळच्या सुमारास गावातील नागरिकांना कळताच बघण्याकरीता मोठी गर्दी केली. याबाबत माहिती तात्काळ देसाईगंज पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतकाचे शव उत्तरीय तपासणी करीता ग्रामीण रुग्णालय वडसा येथे पाठविले. मृतकाची अद्याप ओळख पटली नसून पुढील तपास देसाईगंज पोलीस करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Ok, Go it!
To Top
-->