चंद्रपूर: तात्काळ पंचनामे करुन सरसकट नुकसान भरपाई द्या : आ. किशोर जोरगेवार यांची मुख्यमंत्री यांना मागणी | Batmi Express

Chandrapur News,Chandrapur,Chandrapur Live,MarathiNews,Chandrapur Flood 2023,Chandrapur News IN Marathi,

Chandrapur News,Chandrapur,Chandrapur Live,MarathiNews,Chandrapur Flood 2023,Chandrapur News IN Marathi,

चंद्रपूर :
 आमदार किशोर जोरगेवार यांनी मतदार संघातील ग्रामिण भागातील पूरपस्थितीची पाहणी केली असून येथील उपाययोजनांचा आढावा घेतला आहे. पूराच्या पाण्याने शेतक-यांचे मोठे नुकसाण झाले असून नुकसानग्रस्तांना सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली आहे.

यावेळी तहसीलदार विजय पवार, नायब तहसीलदार संतोष खांडरे, कृषी अधिकारी भास्कर गायकवाड, मंडळ अधिकारी किशोर नवले, घुग्गुसचे पोलिस निरिक्षक आसिफ शेख, यंग चांदा ब्रिगेडचे ग्रामीण तालुका अध्यक्ष राकेश पिंपळकर, मुन्ना जोगी, वढा गावचे सरपंच सुनिल निखाडे, किशोर वरारकर, सचिन तोडे, नंदकिशोर वासाडे, चंदु माथने, पिपरिच्या सरपंच्या वैशाली माथने, माजी सरपंच गणपत कुडे आदींची उपस्थिती होती.

हे देखील वाचा:

वडसा: सावंगी नदीपात्रात आढळला अनोळखी इसमाचा मृतदेह

यवतमाळ जिल्हातील नदी पात्रात वाढ झाल्यामुळे चंद्रपूरातील नद्यांना पूर आला आहे. सध्या परिस्थिती आटोक्यात असली तरी या पूराच्या पाण्याने शहरी भागासह ग्रामीण भागाचे मोठे नुकसाण केले आहे. चंद्रपूर मतदार संघाचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी शहरी भागाच्या पाहणी नंतर आज मतदार संघातील ग्रामीण भागाची पाहणी केली असून पूरपरिस्थितीचा आढावा घेतला आहे.

यावेळी त्यांनी धानोरा, पिपरा, मारडा यासह प्रभावीत गावांची पाहणी केली आहे. पूराचे पाणी शेतात साचल्याने शेतक-यांचे मोठे नुकसाण झाले आहे. नुकतीच रावलेली शेतपिके पाण्याखाली गेल्याने पिक पून्हताह नष्ट झाली आहेत. शेतीसह या भागातील घरांचेही मोठ्या प्रमाणात नूकसाण झाले आहे.

हे देखील वाचा:

Breaking! वाघाच्या हल्ल्यात गुराखी गंभीर जखमी.!

त्यामुळे या भागातील पंचनामे जलद गतीने पूर्ण करण्याच्या सुचना यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी प्रशासनाला केल्या आहे. यावेळी जोरगेवार यांनी शेतक-यांशी चर्चा करुन त्यांच्या अडचणी समजून घेत सरसकट नुकसाण भरपाई देण्यात यावी अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.