पोंभुर्णा:- दिनांक 29/07/2023 रोजी दुपारी मध्य चांदा वनविभाग अंतर्गत पोंभूर्णा वनपरिक्षेत्रातील घोसरी उप वनक्षेत्रात कक्ष क्रमांक 553 बी मधील रोपवनात मादी वाघिणीला अखेर जेरबंद करण्यात यश आले.
मागील काही दिवसा पासून सदर मादी वाघिणीचा मौजा झगडकर रिठ, पीपरी देशपांडे, दिघोरि, ठाणेवासना, झगडकर रिठ, पीपरी देशपांडे, दिघोरि, नवेगाव मोरे गावा नाजिक च्या शेतशिवारा मधे वाघिणीचा हाहाकार दिसून येत होता. सदर मादी वाघीण गावानजीक गावठी जनावरांची शिकार करत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. मानव वन्यजीव संघर्षाची अप्रिय घटना टाळण्यासाठी वनविभागाने तातडीने पावले उचलली आणि पशू वैद्यकीय अधिकारी यांच्या चमूला घटना स्थळी पाचारण केले. सदर वाघिनीवर नजर ठेवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान असलेले लाईव्ह कॅमेरे लावण्यात आले. पशु वैद्यकीय अधिकारी यांच्या चमूला आज वाघिणीच्या हालचालींची माहिती मिळताच वाघिणीला बेशुद्ध करून जेरबंद करण्यात आले. जेरबंद करण्यात आलेल्या वाघिणीला पुढील तपासणी करिता चंद्रपूर येथील उपचार केंद्रात पाठविण्यात आले आहे.
सदर कार्यवाही ही श्री जितेंद्र रामगावकर, मुख्य वनसंरक्षक चंद्रपूर, श्रीमती श्वेता बोड्डू, उप वनसंरक्षक मध्य चांदा यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ रविकांत खोब्रागडे पशू वैद्यकीय अधिकारी, श्री अजय मराठे व ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प जलद बचाव दल चमू आणि पोंभूर्णा वनपरिक्षेत्र अधिकारी फणिंद्र गादेवार, क्षेत्र सहायक अजय बोधे, वनरक्षक सूरज मेश्राम व इतर कर्मचारी यांनी पार पाडली.