भंडारा जिल्ह्यात 37(1) (3) कलम लागू | Batmi Express

Bhandara,Bhandara Live,Bhandara Today,Bhandara Batmya,Bhandara News,

Bhandara,Bhandara Live,Bhandara Today,Bhandara Batmya,Bhandara News,

भंडारा, दि. 28: उद्या दि.29 जुलै रोजी मोहरम हा सण साजरा करण्यात येणार आहे.तसेच 1 ऑगस्ट 2023 रोजी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती,9 ऑगस्ट 2023 रोजी जागतिक आदिवासी दिवस साजरा करण्यात येणार आहे.मोहरम सणा निमित्त मुस्लिम धर्मीय तसेच इतर धर्मातर्फे सवारी,मिरवणुक काढण्यात येते, मोहरम निमित्त निघणाऱ्या मिरवणुक पहायला लोकाची गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

तसेच एस.एस.सी व एच.एच.सी परिक्षेचा निकाल लागलेला असून पदविधर शिक्षणाकरिता विद्यार्थ्यांची वेगवेगळ्या कॉलेजमध्ये प्रवेशाकरिता चढाओढ लागणार आहे. तसेच पावसाळा सुरू झालेला असल्याने शेतकरी आपल्या शेतीच्या कामाला लागलेला आहे.
पावसाळी हंगामाकरिता शेतकऱ्यांनी बि-बियाणे, खते, रासायनिक औषधी स्वस्त दरात उपलब्ध करुन द्यावेत व त्याचा नियमित पुरवठा करावा, पुर्नवसन, वाढती महागाई, बेरोजगारी तसेच विविध मागण्यांना घेऊन राजकीय पुढारी मजुर वर्ग व शेतकरी वर्गाला हाताशी धरून धरणे, मोर्चे, आंदोलने, निदर्शने आयोजित करण्याची शक्यता नाकारता येत नाही.
त्यामुळे जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने 28 जुलै 2023 ते 11 ऑगस्ट 2023 पर्यत 1951 च्या मुंबई पोलीस अधिनियमाचे कलम 37 (1) (3) चे आदेश अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी लीना फलके यांनी लागू केले आहे.
या अधिसूचनेतील कोणत्याही शर्तीचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर फौजदारी नियमाअंतर्गत

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.