वडसा: गळफास घेवून युवकाची आत्महत्या.! | Batmi Express

wadsa,crime news,Gadchiroli,Wadsa Suicide,Crime,suicide,Wadsa News,Gadchiroli Suicide,Gadchiroli Batmya,Desaiganj,
wadsa,crime news,Gadchiroli,Wadsa Suicide,Crime,suicide,Wadsa News,Gadchiroli Suicide,Gadchiroli Batmya,Desaiganj,

वडसा (देसागंइज) :- तालुक्यापासून पासून काही किलोमिटर अंतरावर असलेल्या कुरुड येथे गळफास घेवून युवकाची आत्महत्या केल्याची घटना आज दि: २८ जुलै २०२३ ला घडली. गळफास घेतलेल्या युवकाचे नाव  भोला देवराव साहरे (वय २३) सुभाष वॉर्ड कुरुड येथील रहिवाशी असे आहे.

सविस्तर वृत्तांत असे आहे की, भोला सहारे यांची आई धान रोवणी करायला बाहेर गावी गेली असल्याचे बोलले जात असून घरी कुणी नसल्याचा फायदा घेत राहत्या घरी गळफास घेत भोला याने जीवनयात्रा संपविली.आत्महत्येचा करण्याचे कारण कळू शकले नाही.

भोला सहारे यांच्या पच्छात्य आई असून लहानगा परिवार असल्याने आईचा कर्ता मुलगा गेल्याने आईवर खुप मोठा दुःखाच डोंगर कोसळला असून गावपरीसर शोकसागरात बुडालेला आहे.

घटनेचा पुढील तपास पोलीस स्टेशन देसाईगंजचे अधिकारी कर्मचारी  करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.