गडचिरोली, दि. २० मार्च : शहरातील चंद्रपूर या मुख्य मार्गावर असलेल्या कृषी विज्ञान केंद्राच्या (Agricultural Science Center ) आवारात शिरलेल्या वाघिणीस गडचिरोली वनविभागाने रेस्क्यू टीमच्या (Gadchiroli Forest Department ) साहाय्याने वाघिणीला जेरबंद केल्याने वन विभागासह नागरिकांनाही मोठा दिलासा मिळणार आहे.
शहराच्या मध्यभागी असलेल्या आयटीआय चौकात असलेल्या कृषी विज्ञान केंद्राच्या आवारात आज २० मार्च रोजी वाघ आढळून आल्याची माहिती शहरभर पसरली. सदर माहिती वनविभागाला देण्यात आली असता चंद्रपूर येथून रेस्क्यू टीम पाचारण करण्यात आले होते. दरम्यान अथक प्रयत्नानंतर रेस्क्यू टीम ने मोहीम राबवत अखेर वाघिणीला जेरबंद करण्यात आले आहे.
वाघिण आढळल्याने शहरवासीयांनी बघण्याकरिता एकचं गर्दी केली होती. मात्र आता वाघिणीला जेरबंद केल्याने नागरिकांनाही मोठा दिलासा मिळणार आहे.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.