सिंदेवाही (Sindevahi) : सिंदेवाही तालुक्यातील आंबोली शेत शिवारात काम करताना वीज पडल्याने महिला मजूर जखमी झाल्याची घटना उघडकीस आली. सदर घटना शनिवारी दुपारी घडली. असुन महिलेचे नाव गीता नीलकंठ लोखंडे (३४) असे आहे.
माहितीनुसार गीता लोखंडे व अनेक महिला मजूर यांच्यासह शेतात काम करत होत्या. अचानक गीता लोखंडे याच्या अंगावर वीज पडली. आणि त्या किरकोळ जखमी झाल्या. माहिती होताच त्यांना उपचाराकरिता ग्रामीण रुग्णालय सिंदेवाही येथे भरती करण्यात आले.