मुंबई: राज्याची राजधानी मुंबई लालबाग मधल्या हत्याकांडानं हादरली. 24 वर्षीय मुलीने आपल्या 55 वर्षीय जन्मदात्या आईची हत्या केली. तरुणीचे नाव रिंपल जैन (Rimple Jain) असं आहे. सविस्तर वृतांत - रिंपल जैन या 24 वर्षीय मुलीने आपल्या 55 वर्षीय जन्मदात्या आईची हत्या केली. एवढंच नाही तर आईच्या मृतदेहाचे तुकडे - तुकडे करुन 3 महिने तीचा मृतदेह कपाटात लपवून ठेवला. गेल्या डिसेंबर मध्ये या निर्दयी मुलीने तीच्या आईची हत्या केली.
मग इलेक्ट्रिक मार्बल कटर, कोयता आणि सुरीच्या मदतीने आईच्या मृतदेहाचे अनेक तुकडे केले. हे तुकडे या मुलीने कपाटात, फ्रिजमध्ये, पाण्याच्या ड्रममध्ये ठेवले होते. मृतदेहाचा कुणालाही वास येऊ नये / वास भास होऊ नये म्हणून केमिस्टमधून परफ्यूम ( perfume ) आणि एअर फ्रेशनरच्या (air freshener ) 200 पेक्षा जास्त बॉटल्स मृतदेहावर स्प्रे केलं होत.
आजूबाजूचे शेजारी जेव्हा आईची चौकशी करायचे तेव्हा सहलीवर गेल्याची काल्पनिक गोष्ट ही मुलगी सांगायची. ज्यादिवशी तीचा मामा पैसे देण्यासाठी घरी आला तेव्हा हे हत्याकांड समोर आलं. पोलिसांना घरात प्लास्टिकची गोणी सापडली, ज्यात कुजलेलं धड होतं. तर एका छोट्या स्टीलच्या टाकीतून हात आणि पाय जप्त करण्यात आले. तुकड्यांना कीडे पडून त्यातून दुर्गंधी येत होती.. पोलिसांनी रिंपलला अटक केली असून किरकोळ वादातून हत्या केल्याचं पोलिसांनी म्हणणं आहे.