Chandrapur Yellow Alert: चंद्रपूर जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना, वादळ वारा व गार पडण्याची शक्यता | Batmi Express

Be
0

Nagpur,Nagpur LIve,Nagpur Today,nagpur news,Nagpur LIve News,Nagpur Marathi News,Maharashtra,

हायलाइट्स :

  • १७ व १८ मार्च रोजी ऑरेंज तर १९ ते २१ मार्च दरम्यान येलो अलर्ट जारी
  • नागरिक व शेतकऱ्यांना शासनाच्या सुचनांचे पालन करण्याचे आवाहन

चंद्रपूर : भारतीय हवामान खात्याने चंद्रपूर जिल्ह्यात १७ ते २१ मार्च २०२३ या कालावधीत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस व जिल्ह्यातील एक दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना, वादळ वारा (वेग ३० ते ४० कि.मी. प्रति तास) तसेच गारा पडण्याची शक्यता वर्तविली आहे. १७ ते १८ मार्च २०२३ या कालावधीकरीता ऑरेंज अलर्ट व १९ ते २१ मार्च २०२३ या कालावधीकरीता येलो अलर्ट जारी केला आहे.

नागरीकांनी विशेषत: शेतकऱ्यांनी पाऊस व गारपिटीचा अंदाज लक्षात घेता रब्बी हंगामातील परिपक्व अवस्थेतील हरभरा, गहू, मोहरी, जवस आदी पिकांची आवश्यक काळजी घ्यावी. वीज गर्जना होत असताना शक्यतो घरातच राहणे आवश्यक आहे. शेतात कामाला जात असताना अशा कालावधीमध्ये मोबाईल फोन सोबत बाळगू नये. वीजगर्जना सुरू असताना घरातील इलेक्ट्रिकल उपकरणे बंद ठेवावी. पाऊस व वीज गर्जना होत असताना चुकूनही झाडाच्या खाली उभे राहू नये. शेतात काम करीत असताना सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा. जनावरांना मोकळ्या जागेत चारावयास सोडण्याचे टाळावे. तसेच गोठ्यामध्येच चारा व पाण्याची उपलब्धता करून द्यावी.

जिल्ह्यातील नागरिकांनी व शेतकऱ्यांनी शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. शेतातील पिकांची, जनावरांची आवश्यक काळजी घ्यावी व स्वसंरक्षणासाठी सतर्क रहावे, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सचिव तथा निवासी उपजिल्हाधिकारी विशालकुमार मेश्राम यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Ok, Go it!
To Top
-->