'
30 seconds remaining
Skip Ad >

चंद्रपूर: अनैतिक देहव्यापार अड्ड्यावर चंद्रपूर पोलिसांची मोठी कारवाई | Batmi Express

0
Chandrapur,Chandrapur Crime,Chandrapur Live,Chandrapur News,Chandrapur Today,Chandrapur Crime Live,

हायलाइट्स :

  • देहव्यापार अड्ड्यावर कारवाई करीत 2 पीडित मुलींची सुटका
  •  2 पीडित मुलींन महिला सुधारगृहात पाठविण्यात आले

चंद्रपूर:- दिनांक १५/०३/२०२३ रोजी स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर यांना खबर मिळाली की, पोलीस स्टेशन भद्रावती हद्दीत एका ठिकाणी अवैधरित्या अनैतिक देहव्यापार सुरु असुन त्या ठिकाणी एक महीला स्वतःचे आर्थीक फायद्याकरीता मुली व महीलांकडुन देहव्यापार करवुन घेत आहे. अशा मिळालेल्या माहीतीच्या अनुषंगाने श्री बिपीन इंगळे, पोलीस निरीक्षक, पोस्टे भद्रावती आणि श्री मंगेश भोयर सहा. पोलीस निरीक्षक स्थागुशा चंद्रपूर यांचे पथकाने भद्रावती ते वरोरा जाणा-या रोड चे बाजुला असलेल्या शेतशिवारातील एका घरावर छापा कारवाई केली असता त्या ठिकाणी एक स्त्री तिचे आर्थीक फायद्याकरीता दोन महीलांकडुन देहव्यापार करवुन घेत असतांना मिळुन आली. त्या महीलेस सोबतच्या महीला पोलीस अंमलदारांचे मदतीने ताब्यात घेवुन अटक करण्यात आली असुन इच्छेविरुध्द देहव्यापार करवुन घेत असलेल्या दोन्ही पिडीत महीलांची सुटका करण्यात आल्याने मा. न्यायालयाने आदेशाने त्यांना महिला सुधारगृहात पाठविण्यात आले आहे.


अनैतिक देहव्यापार करवुन घेत असलेल्या महीले विरूध्द पोलीस स्टेशन भद्रावती येथे अपराध क्रमाक १२४ / २०२३ कलम ३७० भा.दं.वि. सह कलम ३, ४, ५ अनैतीक मानवी व्यापार (प्रतीबंधक) अधिनियम १९५६ अन्वये गुन्हा नोद करण्यात आला असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस स्टेशन भद्रावती करीत आहे.

सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक चंद्रपूर, अपर पोलीस अधीक्षक, चंद्रपूर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी, वरोरा यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक श्री महेश कोंडावार, स्थागुशा चंद्रपूर, पोलीस निरीक्षक श्री बिपीन इंगळे, पोस्टे भद्रावती, सहायक पोलीस निरीक्षक श्री मंगेश भोयर स्थागुशा चंद्रपूर, स्थागुशा चे पोलीस अंमलदार स्वामीदास चालेकर, धनराज करकाडे, चंदु नागरे, अजय बागेसर, संदिप मुळे, प्रशांत नागोसे, दिनेश अराडे तसेच पोस्टे भद्रावती येथील पोलीस अंमलदार अनुप आस्टुनकर, विश्वनाथ चुदरी, रोहीत चिचगीरे, मोरेश्वर पिदुरकर, महीला अंमलदार सुषमा पवार, गिता उमरे, सोनु कोसरे यांनी केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×