तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

गोंडवाना विद्यापीठाच्या खेळाडू विद्यार्थिनींसोबत प्रशिक्षक व व्यवस्थापकाचे गैरवर्तन? विद्यार्थिनींची विद्यापीठात तक्रार; कारवाईची मागणी | Batmi Express

Gadchiroli,Gadchiroli Live News,Gadchiroli Batmya,Gondwana University,Gadchiroli Crime,Gadchiroli News,
Gadchiroli,Gadchiroli  Live News,Gadchiroli Batmya,Gondwana University,Gadchiroli Crime,Gadchiroli News,

गडचिरोली:- चेन्नई येथे आयोजित बॉल बॅडमिंटन स्पर्धेसाठी गोंडवाना विद्यापीठातर्फे गेलेल्या खेळाडू विद्यार्थिनींसोबत प्रशिक्षक व व्यवस्थापकाने मद्यधुंद अवस्थेत गैरवर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी विद्यार्थिनींनी गोंडवाना विद्यापीठात तक्रार दाखल करत कारवाईची मागणी केली आहे. गोंडवाना विद्यापीठ यांच्यावर काय कारवाई करणार हे पाहावे लागेल. गोंडवाना विद्यापीठ काहीना काही कारणाने चर्चेत असतो. हा मुद्दा सुध्दा गोंडवाना विद्यापीठाच्या सभेत गाजण्याची शक्यता आहे. जबाबदारी सांभाळणाऱ्या व्यक्तीने असे कृत्य करत असेल तर ही धक्कादायक बाब आहे.

गोंडवाना विद्यापीठाकडून २५ जानेवारी रोजी चेन्नई येथे बॉल बॅडमिंटन स्पर्धेसाठी दहा विद्यार्थीनींची चमू पाठविण्यात आली होती. त्यांच्यासोबत प्रशिक्षक म्हणून राजेश हजारे व व्यवस्थापक डॉ. विजय सोमकुंवर हे होते. मात्र, चेन्नईत गेल्यापासून मद्यप्राशन करून खेळाडू मुलींसोबत गैरवर्तन सुरू केले. इतक्यावरच न थांबता अमरावती व मुंबई विद्यापीठातील मुलींसोबत देखील चार्जर मागण्याच्या बहाण्याने खोलीत जाऊन गैरवर्तन केले. पूर्ण वेळ हे  दारूच्या नशेत असायचे. त्यामुळे मुलींमध्ये भीतीचे वातावरण होते. स्पर्धा संपवून परत आलेल्या मुलींनी सोमवारी तत्काळ प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे यांची भेट घेऊन घडलेल्या प्रकाराची तक्रार देत कारवाईची मागणी केली आहे.

कोणत्याही विद्यापीठातील महिला खेळाडूंना स्पर्धांसाठी पाठविताना महिला प्रशिक्षक किंवा सहकारी देणे आवश्यक आहे. मात्र. गोंडवाना विद्यापीठाकडून याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे चित्र आहे. हा सर्व प्रकार संतापजनक आहे. त्यामुळे दोषी प्रशिक्षक व व्यवस्थापकाला तात्काळ निलंबित करून त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात यावी. अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष लीलाधर भरडकर यांनी केली.

Gadchiroli:- A shocking case of drunken misbehavior by the coach and manager with the female players who went to Gondwana University for the Ball Badminton Tournament organized in Chennai has come to light. In this matter, the students have filed a complaint with the Gondwana University and demanded action. We have to see what action will be taken against Gondwana University. Gondwana University is in the news for some reason. This issue is also likely to come up in the meeting of Gondwana University. It is shocking if a responsible person is doing such an act.

A team of ten students was sent from Gondwana University to Chennai on 25th January for Ball Badminton Tournament. Rajesh Hazare as coach and manager Dr. It was Vijay Somkunwar. However, after moving to Chennai, he started misbehaving with the player girls by consuming alcohol. Without stopping, he went to the room and misbehaved with the girls from Amravati and Mumbai University on the pretext of asking for a charger. He was drunk all the time. So there was an atmosphere of fear among the girls. The girls who came back after finishing the competition immediately met the Vice-Chancellor Dr. They have complained about the incident after meeting Shriram Kawle and demanded action.

Any varsity must provide female coaches or teammates when sending female athletes to competitions. However. This is a picture of being ignored by Gondwana University. This is all kind of annoying. Therefore, the guilty coach and manager should be immediately suspended and criminal action should be taken against them. Such a demand was made by District President of NCP Youth Congress Leeladhar Bharadkar.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.