सोर्स: गोसीखुर्द पूर 2025 लाईव्ह AI कव्हरेज
भंडारा (Bhandara Gosikhurd Dam): गोसीखुर्द च्या पाणलोट क्षेत्रात मागील तीन दिवसापासून गडचिरोलीसह चंद्रपूर,भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात दमदार पावसाची हजेरी होत असल्याने गोसीखुर्द धरणाच्या पाणी साठयात वाढ झाल्याने धरणाचे 9 गेट उघडण्यात आले असून 1158 क्युमेक्स वेगानं पाण्याचा विसर्ग वैनगंगा नदी पात्रात सुरु आहे. सध्या गोसीखुर्द चे 9 दरवाजे अर्धा मीटरनं उघडले असल्याची माहिती आली. 9 दरवाज्यातून 1 हजार 158 क्युमेक्स पर्यंत पाणी विसर्ग वैनगंगा नदी पात्रात करण्यात येत आहे. आवशक्यता पडल्यास विसर्गात पुन्हा वाढ होईल - अशी शक्यता दर्शविण्यात्त येत आहे. असं आवाहन प्रशासनानं केलं आहे.
आज दुपारी 2 वाजताच्या सुमारास गोसेखुर्द धरणाच्या 33 दरवाज्यांपैकी 9 वक्रदारे खुली करण्यात आली असून अंदाजे 950 क्युमेक्स पाणी नदीपात्रात सोडण्यात आले आहे.दोन्ही जलविद्युत प्रकल्पांचा 208 क्युमेक्स विसर्ग पकडून एकूण अंदाजे 1158 क्युमेक्स पाणी नदीपात्रात सोडण्यात आले असल्याने वैनगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होत आहे.नदीकाठावरील गावांतील नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेऊन नदीपात्रात अवागमण करु नये व सतर्क राहण्याच्या सूचना आपत्ती व्यवस्थापन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
नदी काठच्या गावांना इशारा - चंद्रपुर , गडचिरोली:
गोसीखुर्द धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्याकरिता पुढील काही तासात धरणाच्या विसर्गात पुन्हा वाढ होईल. नदी काठांवर राहणारे आणि नदी पात्रातून ये- जा करणाऱ्या नागरिकंनी काळजी घ्यावी, सतर्क रहावे, असे आवाहन धरण प्रशासनाने केले आहे.