वडसा: 23 वर्षीय तरुणाची घरीच गळफास घेऊन आत्महत्या | Batmi Express

wadsa,Wadsa news,Wadsa live,Wadsa News,Wadsa Suicide,Wadsa Today,Gadchiroli,Gadchiroli News,Gadchiroli Suicide,

wadsa,Wadsa  news,Wadsa live,Wadsa News,Wadsa Suicide,Wadsa Today,Gadchiroli,Gadchiroli News,Gadchiroli Suicide,

वडसा (गडचिरोली):- वडसा (देसाईगंज) शहराच्या नगर परिषद हद्दीत येणाऱ्या नैनपुर येथे एका 23 वर्षीय तरुणाने स्वतःच्या घरीच दुपट्ट्याच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खबळजनक घटना आज, रविवार 8 जून रोजी सकाळी अंदाजे पावणे अकरा वाजताच्या सुमारास उघडकीस आली. गळफास घेत आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव  दीपक दत्तू चौधरी (वय 23 ) वर्षे,रा.नैनपुर,देसाईगंज असे आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दीपक हा आज सकाळच्या सुमारास काही कामानिमित्त घराबाहेर पडला होता. बाहेरून घरी आल्यानंतर अंगावरील कपडे काढत त्याने घराला लागूनच असलेल्या एका खोलीतील स्लॅबच्या हुकाला दुपट्ट्याच्या साहाय्याने गळफास घेत जीवनयात्रा संपवली. घरच्यांनी घराच्या बाजूला असलेल्या खिडकीतून डोकावून पाहीले असता दीपक हा गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. दीपकला पाहताच कुटुंबीयांनी एकच हंबरडा फोडला. सदरची घटना गावात वाऱ्यासारखी पसरली. घटनेबाबत वडसा (देसाईगंज) पोलिसांना माहिती देण्यात आली असून दुपार पर्यंत पोलीस ताफा घटनास्थळी दाखल व्हायचा होता. 23 वर्षीय दीपकने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल कां उचलले? याबाबत अद्याप कळू शकले नाही.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.