तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

चंद्रपूरात धारदार शस्त्राने युवकाची हत्या, धडावेगळे केले शीर | Batmi Express

Chandrapur,Chandrapur News,Chandrapur Crime,Chandrapur Crime News,Chandrapur Murdered,Chandrapur Murder,

Chandrapur,Chandrapur News,Chandrapur Crime,Chandrapur Crime News,Chandrapur   Murdered,Chandrapur  Murder,

चंद्रपूर
:- चंद्रपूरलगत असलेल्या दुर्गापूर परिसरात चंद्रपूर वीज निर्मिती केंद्राच्या मेजर गेट जवळ नायरा पेट्रोल पंपजवळ एका इसमाची धारदार शस्त्राने धडावेगळे शीर करून निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना सोमवारी रात्री 10.45 वाजताच्या सुमारास घडली. महेश मेश्राम (32) रा. आयप्पा मंदिर परिसर चंद्रपूर असे मृतकाचे नाव असल्याचे बोलले जात आहे. मात्र याला दुजोरा मिळाला नाही या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

घटनेची माहिती होताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली होती. ही हत्या जुन्या वैमनस्यातून झाल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे, घटनास्थळापासून काहीच अंतरावर दुर्गापूर पोलीस ठाणे आहे. सुमारे ४-५ जणांनी मिळून आरीने शीर कापून हत्या केल्याचे बोलले जात आहे. घटनेची माहिती होताच दुर्गापूर पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन लगेच घटनास्थळावरून हलविला.
दुर्गापूर येथे रात्री 12.20 वाजता पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेचा आढावा घेतला.
घटनास्थळी पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी हे ठाणेदार स्वप्नील धुळे यांच्याकडून घटनेची माहिती जाणून घेत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.