व्यंकटापुर:- मानवविकास मिशन अंतर्गत टेकडा ते सिरोंचा पर्यन्त विध्यार्त्यांना नेणारी अहेरी आगाराची बस सिरोंचा ते टेकडा जात असतांना व्येंकटापूर जवळ ठिक सकाळी 7.10 वाजता स्टेरिंगच्या बिगाड मुळे रस्त्याच्या खाली शेतात उतरून गेली मात्र सुदैवाने जीवितहानी टळली. हाच बस दिवाळी पूर्वी सुरयपल्ली येते असाच झाला होता.
अशा घटना मागे नेमका कोण कारणीभूत असेल ? अहेरी बस डेपोचे अधिकारी बसची दुरुस्तिकडे लक्ष देत नसावा का ? बस चालक का?रस्त्यावरील खड्डे असेल का ? एखाद्या वेळेला जर शाळेचे मूल मूल प्रवासात असतांना जर अशाप्रकारे झाल्यास कोण जबाबदार राहणार ? इतले आगार प्रमुख का ? मानवविकास मिशनाचे अधिकारी का ? राजकीय पुढारी का? वाहतूक व्यवस्था का? या सर्व करणाकडे जनतेने/पालक वर्गाने लक्ष देऊन या बेजबाबदारी अधिकारी वर्गाच्या झोप उडवून यांना धडा शिकवणे जरुरीचे आहे. नाही तर भविष्यात अशा प्रकारचे घटना घडून लोकांना / विध्यर्थ्यांना आपले प्राण गमवावे लागते.