नागपूर: नवजात बाळविक्री प्रकरणात डॉक्टरसह आणखी दोघांना अटक | Batmi Express

Be
0

Nagpur LIve,nagpur news,Nagpur,crime Nagpur,Nagpur Marathi News,Nagpur Crime,

नागपूर :
नवजात बाळविक्री प्रकरणात तोतया डॉक्टर श्वेता ऊर्फ आयशा खान व तिचा पती मकबुल खान अहमद खान आणि डॉ. प्रवीण रतनसिंह बैस यांचा सहभाग स्पष्ट झाला आहे. त्यामुळे दोघांनाही एएचटीयूच्या पथकाने अटक केली. पती आणि डॉक्टरच्या अटकेमुळे श्वेता खानच्या अडचणी वाढल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्वेता खान (लालबर्रा, बालाघाट) हिने नवजात बाळविक्री करण्यासाठी मोठी टोळी तयार केली आहे. सफाई कर्मचारी असलेल्या श्वेताने स्वत: प्रसूतीतज्ज्ञ असल्याचे घोषित करून मध्यप्रदेशात रुग्णालय सुरू केले होते. तेथून श्वेता व तिचा पती मकबुल खान यांनी नवजात बाळविक्रीचा व्यवसाय सुरू केला होता.

आतापर्यंत अनेक नवजात बाळांची डॉ. प्रवीण बैस (३९, न्यू बिडीपेठ, संतोषी मातानगर) याच्या वर्धा रोडवरील क्लिनिकमधून तपासणी करून सौदा करण्यात आला.
चार दिवसांचे बाळ गुजरातमधील अहमदाबाद येथे राहणारे दाम्पत्य विनय आणि मोनिका सुलतयानी यांनी ३ लाखांत खरेदी केले होते. याप्रकरणी हुडकेश्वर ठाण्यात दाखल गुन्ह्यात श्वेतासह तिचा पती मकबुल खान आणि बाळांची तपासणी करून विक्री करण्यास प्रोत्साहन देणारा डॉ. प्रवीण बैस यांना अटक करण्यात आली. बाळ विक्रीच्या गुन्ह्यात आतापर्यंत ८ ते १० आरोपींना अटक करण्यात आली असून आणखी काही आरोपींना अटक करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Ok, Go it!
To Top
-->