कोरची(प्रतिनिधी)- आज दि. 30/11/2022 ला बोटेकसा केंद्राची पाचवी शिक्षण परिषद कोरचीवरून दहा किलोमीटर असलेल्या छत्रपती हायस्कुल मसेली येथे संपन्न झाली. या शिक्षण परिषदेला अध्यक्ष मा.डी.आर. मेश्राम प्राचार्य छत्रपती हायस्कुल मसेली हे होते. उद्घाटक श्री. किशोर बावणे केंद्रप्रमुख बोटेकसा हे होते. प्रमुख पाहुणे म्हणुन सौ.उमा बुद्धे मुख्याध्यापीका, श्री. ढबाले सर मु.अ., दमयंती कुरंजेकर मु.अ. हे होते. येथे सरस्वती माता व सावित्रीबाई फुले प्रतिमा पुजन करण्यात आले.
श्री.किशोर बावणे, केंद्रप्रमुख बोटेकसा यांनी प्रास्ताविकेमधुन गडचिरोली जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात राबविण्यात येत असलेल्या फुलोरा या शैक्षणिक उपक्रमाची अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरावरून फुलोरा हा मोबाईल ॲप तयार करण्यात आलेला आहे. यात शिक्षक, शाळा, विध्यार्थी यांची शैक्षणीक स्तरावरील माहिती तसेच चाचण्याचा अहवाल भरावयाचा आहे असे विवेचन केले. श्री. राजू परशुरामकर सर, जितेंद्र सहाळा सर , सुलभक नाकाडे सर, भजने सर यांनी फुलोरा बाबत सर्व माहिती प्रात्यक्षिक करून दाखविले.
शैक्षणिक वाटचालीत तंत्रज्ञानाचा वापर शैक्षणिक स्तर अधिक जलद होण्यासाठी केंद्रातील सर्व शिक्षकांची कार्यशाळा आयोजीत करण्यात आलेली होती. शिक्षण परिषदेचे सुत्रसंचालन कु.खेमंतीनी कोवे शिक्षीका मसेली यांनी केले. तर आभार श्री. करवाडे सर कोटरा यांनी मानले. तेलाशी सर, सौ.नंदागवळी जि.प.शा.मसेली यांनी शिक्षण परिषदेच्या यशस्वीतेसाठी सहयोग केले.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.