कोरची(प्रतिनिधी) - आज दिनांक २८/११/२०२२ माळी समाज व कोरची नगरातील समस्त जनता यांचे संयुक्त विद्यमाने महामानव, क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव गोविंदराव फुले यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. महाराष्ट्राला पुरोगामी विचार देणारे सत्यशोधक समाजाचे संस्थापक, स्री शिक्षणाचे जनक, जगातील पहिले शिवशाहीर, पददलितांचे उध्दारकर्ते, समतेचे शिकवण देणारे आद्य शिक्षक, शिक्षणाचे महत्व अवघ्या समाजाला बाणेदारपणे सांगणारे,
विद्ये विना मती गेली
मती विना निती गेली
निती विना गती गेली
गती विना वित्त गेले
वित्ताविना शुद्र खचले
इतके अनर्थ एका अविद्ये ने केले
हा सिद्धांत मांडणारे थोर विचारवंत, लेखक, समाजशिक्षक
राष्ट्रपिता महात्मा फुले यांच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करण्यासाठी जनसमूह एकत्र आले. कार्यक्रमाचे संचालन मानसी शामराव वाढई, मार्गदर्शन राकेश मोहूर्ले यांनी केले तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी केशव मोहूर्ले, श्रीहरी मोहूर्ले, संतोष मोहूर्ले, प्रशांत मोहूर्ले, गोपाळ मोहूर्ले, श्यामराव वाढई, बेबीबाई मोहूर्ले, निलकमल मोहूर्ले, निरुताई शेंडे, तसेंच सर्व माळी समाज बांधव, युवक व युवती मंडळी मोठया संख्येने उपस्थित होते.