गोसीखुर्द धरणाचे पाणलोट क्षेत्रात (मध्यप्रदेश) संततधार पाऊस पडत असल्यामुळे तसेच ऊर्ध्व भागातील धरणामधून (धापेवाडा) पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात वाढविण्यात आल्यामुळे गोसीखुर्द धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्याकरिता पुढील तासात धरणाचा विसर्ग 10000 ते 12000 क्युमेक्स पर्यंत टप्प्याटप्प्याने वाढविण्यात येईल तरी नदी पात्रात आवागमन करणाऱ्यांनी काळजी घ्यावी व सतर्क रहावे.
गोसीखुर्द धरणाचे 33 गेट 1 मी. ने उघडण्यात आले असून
7211.57 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
गोसीखुर्द धरणाचे पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस पडत असल्यामुळे गोसीखुर्द धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्याकरिता पुढील तासात धरणाचा विसर्ग 12000 क्युमेक्स पर्यंत टप्प्याटप्प्याने वाढविण्यात येईल तरी नदी पात्रात आवागमन करणाऱ्यांनी काळजी घ्यावी व सतर्क रहावे.
• संजय सरोवर धरणाचे 10 पैकी 3 गेट उघडलेले असुन 17,552 क्युसेक्स (497 क्युमेक्स) विसर्ग सुरु आहे.
• गोसीखुर्द धरणाचे 33 पैकी 33 गेट 1.0 मी. ने उघडलेले असुन विसर्ग 7211.57 क्युमेक्स आहे.
• चिचडोह बॅरेज चे 38 पैकी 38 गेट उघडलेले असुन विसर्ग 4,43,345 क्युसेक्स (12,554 क्युमेक्स) आहे.
• आष्टी सरीता मापन केंद्रावरील नोंदीनुसार वैनगंगा नदीची पाणी पातळी इशारा पातळीच्या वर आहे.
• वडसा व वाघोली बुटी या सरीता मापन केंद्रावरील नोंदीनुसार नदीची पाणी पातळी इशारा पातळीच्या खाली आहे.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.