कुरखेडा : तालुका मुख्यालयापासून 18 किमी अंतरावर असलेल्या चिनेगाव येथील 35 वर्षीय काकाने नात्यातील 19 वर्षीय पुतणीवर अत्याचार केला. ही खळबळजनक घटना 2 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास घडली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
सप्टेंबर ०४, २०२२
0
पीडित युवतीचे आई-वडील शेताकडे गेले होते. घरी कोणीच नसल्याची संधी साधून आरोपीने मुलीच्या घरात प्रवेश केला. कपडे फाडून तिच्यावर बलात्कार केला. सायंकाळी पीडित मुलीची आई घरी आली असता मुलगी रडत असल्याचा आवाज आला. आईने आवाज दिला असता आरोपीने घराचा दरवाजा उघडून जंगलात पळ काढला. याबाबत पीडित मुलीने कुरखेडा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.
पोलिसांनी आरोपीविरोधात भादंवि 376 अन्वये गुन्हा दाखल करून शनिवारी दुपारी 12 वाजता अटक केली. आरोपी व पीडित मुलगी एकाच आडनावाचे आहेत.
आरोपी अविवाहित आहे. मुलीला गडचिरोली येथे वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. घटनेचा तपास ठाणेदार अभय आष्टेकर _यांच्या_ मार्गदर्शनात पीएसआय शीतल माने करीत आहेत
Tags
अन्य ॲप्सवर शेअर करा
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.