कोरची: दि गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा कोरची अंतर्गत प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजने मधून नुकताच वारसदारास रुपये दोन लाखाचा लाभ देण्यात आला. प्राप्त माहितीनुसार कोरची तालुका मुख्यालयापासून २० किलोमीटर अंतरावरील कोलूपद्दीकसा या गावातील दसोबाई तुळशीराम उईके यांचे सेविंग खाते को-ऑपरेटिव बँक शाखा कोरची येथून ४३६/- रुपये वार्षिक प्रीमियम भरून विमा काढलेला होता. त्यांचे नुकतेच मागील महिन्यात आजाराने निधन झाले.
यानंतर त्यांच्या वारसदाराकडून कागदपत्रांची पूर्तता शाखेने पूर्ण करून प्रकरण मुख्यालय स्तरावर पाठविण्यात आले. दिनांक ०८ सप्टेंबर २०२२ रोजी शाखा कार्यालयात यांचे वारसा मुलगा विनय तुळशीराम उईके यांना दोन लाखाचे धनादेश वितरित करण्यात आले. सदर धनादेश देताना शाखा व्यवस्थापक एस पी इंदुरकर, निरीक्षक आर एच डोंगरवार, एडिट प्रमुख आर जे जांभुळकर व शाखेतील इतर कर्मचारी वृंद उपस्थित होते. यावेळी शाखा व्यवस्थापक व निरीक्षक यांनी जास्तीत जास्त ग्राहकांनी सदर योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहनही केले.